उस्‍मानाबाद - माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांच्‍या प्रयत्‍नातून आ. रामराव वडपुते यांच्‍या स्‍थानिक विकास निधीतून शहरातील जैन समाज सभागृहास पाच लाखांची निधी मंजूर करण्‍यात आले. या निधीतून बांधण्‍यात येणा-या सभागृहाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम उत्‍सहात संपन्‍न झाला.
  शहरातील झाडे गल्‍ली येथे तपस्‍वी सम्राट प.पू 108 संयमसागरजी महाराज यांच्‍या चरणी श्रीफळ अर्पन करून अशिर्वाद घेतला. त्‍यानंतर सकल जैन समाजाच्‍या वतीने उपस्थित मान्‍यवरांचे स्‍वागत करण्‍यात आले. त्‍यानंतर सैतवाल जैन मंदिराचे अध्‍यक्ष महावीर दुरूगकर, नगरसेवक प्रदिप मुंडे, राजकुमार अजमेरा, ट्रस्‍टी कुणाल गांधी ,चार्तुमास  कमिटीचे अध्‍यक्ष प्रसन्‍न फडकुले यांच्‍या हस्‍ते श्रीफळ वाढुन भूमीपुजन करण्‍यात आले.
   यावेळी तपस्‍वी समा्रट प.पू. 108 संयमसागरजी महाराज सभागृहाच्‍या बांधकामात दर्जेदार व लवकर व्‍हावे, यासाठी आशिर्वाद दिला. चातुर्मास कमिटीचे माजी अध्‍यक्ष उल्‍हास चाकवते, माजी नगरसेवक चंद्रकांत मुडे, सैतवाल जैन मंदिराचे सचिव भारत दुरूगकर, कोषाध्‍यक्ष प्रविण बोपलकर, सहसचिव सुदर्शन कोंडेकर, मनोज चाकवते, स्‍वप्‍निल फडकुले, अतुल अजमेरा, सुहास हिंदाणे, बंटी फलसे, अविनाश ढोकर, विलास दुरूगकर, भारत झांबरे, मिलींद एखंडे, सुरेश फडकुले, धीरज पांडे यासह जैन समाजातील श्रावक - श्रविका मोठया संख्‍येने उपस्थित होते.
   
 
Top