उस्मानाबाद- सन 2014 मध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु होती. पोलीस भरतीच्यावेळी उमेदवारास व जनतेस त्रास होवू नये, याकरीता जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांमार्फत शहनिशा करुन जात, उत्पन्न, रहिवाशी, नॅशनॅलिटीह,नॉन क्रिमीलेअर अशी एकुण 13 हजार 450 प्रमाणपत्र जिल्ह्यातील विविध महाईसेवा /सेतु सुविधा केंद्रामार्फत तहसीलनिहाय वितरण करण्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
    उस्मानाबाद तालुक्यात जात प्रमाणपत्र-406, उत्पन्नाचे- 619, रहिवाशी प्रमाणपत्र- 481, नॅशनॅलिटी  प्रमाणपत्र-276  आणि नॉन क्रिमीलेअरची प्रमाणपत्र-644 अशी एकुण 2 हजार 426 प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तुळजापूर तालुक्यात जात प्रमाणपत्र-318, उत्पन्न- 1 हजार 115, रहिवासी- 368, नॅशनॅलिटी-176 आणि नॉन क्रिमीलेअरची- 499  अशी एकुण  2 हजार 476  प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. उमरगा तालुक्यात जात प्रमाणपत्र-210, उत्पन्न- 1 हजार 64, रहिवाशी-556,    नॅशनॅलिटी-188 आणि नॉन क्रिमीलेअरची-500 अशी एकुण  2 हजार 518   प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे.
लोहारा तालुक्यात जात प्रमाणपत्र-87 ,उत्पन्न-163, रहिवाशी-157, नॅशनॅलिटी-239,   आणि नॉन क्रिमीलेअरची -197 अशी एकुण   843  प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
भूम तालुक्यात जात प्रमाणपत्र-249, उत्पन्न-743, रहिवाशी-179, नॅशनॅलिटी-121   आणि नॉन क्रिमीलेअरची-411 अशी एकुण 1 हजार 703   प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. परंडा तालुक्यात जात प्रमाणपत्र-193 ,उत्पन्न-665, रहिवाशी-214, नॅशनॅलिटी-102   आणि नॉन क्रिमीलेअरची -219 अशी एकुण  1 हजार 393   प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे.    कळंब तालुक्यात जात प्रमाणपत्र-218, उत्पन्न-586, रहिवाशी-138, नॅशनॅलिटी-195   आणि नॉन क्रिमीलेअरची-193 अशी एकुण  1 हजार 330   प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. आणि वाशी तालुक्यात जात प्रमाणपत्र-98, उत्पन्नाची-368, रहिवासी प्रमाणपत्र-69, नॅशनॅलिटी प्रमाणपत्रे -155  आणि नॉन क्रिमीलेअरची प्रमाणपत्रे 71 अशी एकुण   761  प्रमाणपत्राचे वितरण महाईसेवा /सेतु सुविधा केंद्रामार्फत करण्यात आले आहे.                                                

 
Top