वैराग- इतिहासामध्‍ये पहिल्‍यांदाच पंतप्रधानांनी देशातील तमाम विद्यार्थ्‍यांना शैक्षणिक महत्‍व पटवून देण्‍यासाठी एकाच वेळी संवाद साधला. याचा फायदा बार्शी तालुक्‍यातील सुमारे पन्‍नास  हजार विद्यार्थ्‍यांनी घेतला. तालुक्‍यातील 318 शाळांमधून टि. व्‍ही, रेडिओ, इंटरनेट यंत्रनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संभाषण विद्यार्थ्‍यांनी ऐकले.
   डॉ. सर्वपल्‍ली राधाकृष्‍ण यांच्‍या स्‍मृतीनिमित्‍त साजरा करण्‍यात येणारा पाच सप्‍टेंबरचा शिक्षक दिन यावर्षी वेगळेच रूप घेवून आला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्‍वत: गुरूजी बनत देशातील तमाम विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. त्‍यांनी यावेळी केलेल्‍या भाषणामध्‍ये शिक्षण माणूस घडविण्‍याचे काम करतो. त्‍यामुळे शिक्षणाचे महत्‍व जाणून घ्‍या म्‍हणजे परिवर्तन नक्‍की घडेल असे सांगितले. यशस्‍वी होण्‍यासाठी  आत्‍मचरित्र वाचण्‍याचे आवाहन केले. याशिवाय प्रत्‍येक शाळेत स्‍वच्‍छताग्रहांची नितांत आवश्‍यकता असून स्‍वच्‍छ भारत, स्‍वच्‍छ विद्यालय या योजनेबदृल सांगितले. वाचन बौध्दिक विकास करते. आभ्‍यासाबरोबर खेळ , व्‍यायाम यांची ही नितांत आवश्‍यकता आहे. असेही मोदी यांनी सांगितले. स्‍वच्‍छता ही लोकचळवळ व्‍हावी अशी आपेक्षही मोदी यांनी व्‍क्‍त केली.
     बार्शी तालुक्‍यामध्‍ये जिल्‍हा परिषदेच्‍या असलेल्‍या 180 शाळा नगरपालिकेमधील 20 शाळा आणि खाजगी 118 शाळामधील सुमारे पन्‍नास हजार शालेय विद्यार्थ्‍यांनी त्‍या कार्यक्रमाचा लाभ घेतला.  गावामध्‍ये टेलिव्हिजन काही ठिकाणी रेडिओद्वारे तर काही ठिकाणी प्रोजेक्‍टरचा वापर करून मोदी यांचे संभाषण ऐकवण्‍यात आले. तालुक्‍यामध्‍ये जिल्‍हा परिषदेचे  651शिक्षक कार्यरत असून त्‍यांनीही विद्यार्थ्‍यांसोबत मोदी गुरूजींचा धडा ऐकला. ज्‍या ज्‍या गावामध्‍ये जसे जसे संभाषण ऐकवण्‍यात आले किंवा दाखवण्‍यात आले. याचा लेखी आवाहल प्रत्‍येक शाळेतून मागवण्‍यात येणार असल्‍याचे गटशिक्षण अधिकारी जाधव यांनी सांगितले. शिक्षक दिनादिवशी यापूर्वी शैक्षणिक सुट्टी जाहिर केली जात होती. मात्र यावेळी मोदी गुरूजीनींच सुट्टी रद्द करून संवाद साधला. त्‍यामुळे पंतप्रधान काय बोलतात याकडे विद्यार्थी, शिक्षक, नागरिक व राजकीय व्‍यक्‍तीचे चांगलेच लक्ष लागून राहिले होते.

 
Top