पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी (ता. बार्शी) येथील जिल्हा परिषद शाळेतील दारुड्या शिक्षकाची बदली करण्याची मागणी वारंवार करूनही वरिष्ठ प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या पालक व ग्रामस्थांनी पांगरी जि.प.शाळेलाच आज दि. 1 सप्टेंबर पासून कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. मद्यपी गुरुजीमुळे शालेय नुकसान होत असून त्या शिक्षकाची तत्काल बदली करून बरबाद होणारी भावी पिढी वाचवावी अशी मागणी ग्रामस्थ व पालकांनी एका लेखी निवेदनाद्वारे बार्शीचे गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे केली होती.
       गट शिक्षण अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सबंधित शिक्षक हे वर्गावर येताना दारू पिऊन येतात.त्यामुळे ज्या उदेशासाठी शासनाने त्यांची नेमणूक या शाळेत केली आहे तो उदेश त्यांच्या कडून साध्य होत नाही.त्यांच्या वर्गाची गुणवत्ता खूपच खालावलेली आहे.प्रशासनाकडे वारवार लेखी तोंडी निवेदने देऊनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही.एका शिक्षकामुळे एक भावी पिढीच बरबाद होत आहे.सध्या संबंदीत मद्यपी शिक्षक पंधरा दिवसापासून रजेवर असून त्या शिक्षकाच्या वर्गातील मुले दुसर्‍या वर्गात बसवली जात असल्यामुळे एकाच वर्गात सत्तर विद्यार्थी होऊ लागल्यामुळे दोन्ही वर्गातील विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.शिक्षक दिन काही दिवसावर येऊन ठेपला असताना हा प्रकार समोर आल्यामुळे गावात चर्चेला उधाण आले आहे.
 गट शिक्षण अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनावर शालेय वेवस्थापन समितीचे अध्यक्ष(मुली)बाबा जाधव शालेय वेवस्थापन समितीचे अध्यक्ष(मुले )विलास गोडसे उपाध्यक्ष अनिल गरड शालेय वेवस्थापन समिति (उर्दू) चे अध्यक्ष मेहमुद शेख ग्रामपंचायत सदस्य अमृत आरोळे, प्रमोद  देशमुख, रामभाऊ शेळके, प्रमोद सरडे-पाटील,कैमुदिन काजी,मधुकर सरडे,बालाजीकाळे,कुलदीप जगदाळे,उमेश देशपांडे,विशाल गरड,अमर गुरव, पांडुरंग निमकर,बाळासाहेब नाईकवाडि बजरंग पौळ,शिवाजी गोडसे, विष्णु कांबळे यांच्यासह गावातील शेकडो ग्रामस्थ व पालकांच्या सह्या आहेत.
   शालेय वेवस्थापन समितीच्या पदाधिकार्‍यांनी शालेय वेळेत भेट देऊन पाहणी केली असता संबदित शिक्षक हा दारूच्या नशेत तर्र असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. तशी नोंदही त्यानी केंदप्रमुखच्या शेरेबुकात केली होती. तेव्हा पासून विद्यार्थ्‍यांचे अपरिमित होणारे नुकसान टाळण्यासाठी गट शिक्षण अधिकार्‍याकडे समबंधिताच्या बदलीची मागणी करूनही त्याकडे कानाडोळा करण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
 
Top