उस्मानाबाद- सन 2014-15 या शैक्षणिक वर्षात भारत सरकार व शिक्षण फी परीक्षा फी या शिष्यवृत्तीसाठी  ऑनलाईन फार्म भरता यावे यासाठी  वेबसाईट कार्यान्वित करण्यात आली  आहे. अनुसूचित जाती, विमुक्त जातील भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग व इतर मागासवर्ग व  प्रवर्गातील  विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फीचे अर्ज मुदतीत ऑनलाइ्न करण्याचे आवाहन   सहायक आयुक्त्, समाज कल्याण, उस्मानाबाद यांनी केले आहे.                   
    तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती विदयावेतन, परराज्यात शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्यांना सन 2014-15या वर्षापासून ई-स्कॉलरशिप योजनेचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविलयाचे प्राचार्य आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दयावे. विद्यार्थ्यास कांही अडचणी आल्यास संबंधितांस त्वरीत मदत करावी. ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांनी न भरल्यास शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहील्यास त्याची जबाबदारी विद्यार्थी व प्राचार्यावर राहील, याचीही  नोंद घ्यावी.
    ऑनलाईन शिष्यवृत्तीबाबत अधिक  माहिती E.scholarship/maha.E.scholarship या संकेतस्थळावर या उपलब्ध आहे. ऑलनाईन अर्ज भरताना इयत्ता दहावीच्या  परीक्षेचा आसन क्रमाक आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे वर्ष सोबत ठेवणे आवश्यक आहे. या संदर्भात्‍काहीही अडचणी आल्यास सहायक आयुक्त्, समाज कल्याण, उस्मानाबाद यांचेशी त्वरीत संपर्क साधावा.                                            
 
Top