उस्‍मानाबाद - शहरातील श्रीमंत सावता माळी सेवाभावी संस्‍था, क्रांतीसुर्य महात्‍मा ज्‍योतिबा फुले व क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले पुतळा समिती व महात्‍मा फुले समाज सुधारक मंडळाच्‍यावतीने संत शिरोमणी संत सावता माळी मंदीर व सभामंडपाचे भूमीपुजन सोमवार रोजी माजी राज्‍यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून नगरसेवक अमित शिंदे, सतिश दंडनाईक, मिनाक्षी माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. गणपती माळी व विठ्ठल माळी यांनी समाजास 27 गुंठे जागा विनामुल्‍य दिली. त्‍यामुळे त्‍यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी महादेव माळी , अमर माळी, अशोक भोसले, भालचंद्र माळी रविकांत गोरे, बळीराम माळी, नंताजी काळी, रणजित माळी, विक्रम गवळी, महेश माळी, सुनिल गोरे, मुकुंद ढगे, अनिल ढगे, यांच्‍यासह महिला, समाजबांधवांनी परिश्रम घेतले.
 
Top