उस्मानाबाद - जनतादलाचे प्रदेश कार्याध्यक्ष अॅड. रेवण भोलसे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंबई येथील षन्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात अॅड. भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
   यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधानपरिषदेतील पक्षनेते विनोद तावडे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार पुनम महाजन, किरीट सोमया, गोपाळ शेट्टी, आमदार पंकजा पालवे-मुंडे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. मिलिंद पाटील, बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे आदी यावेळी उपस्थित होते.अॅड. भोसले यांनी १९८९ पासून जनता दलात जिल्हाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ता, प्रदेश कार्याध्यक्ष या पदांवर सक्रिय काम केले आहे. तसेच त्यांनी पक्षाच्या चिन्हावर दाेन लोकसभा दोन विधानसभाही लढवल्या आहेत. त्यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार, अल्पसंख्याक, बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सतत संघर्ष केला. तसेच शासनाच्या जनहिताच्या धोरणाविरुद्ध सातत्याने प्रखर हल्ला चढवला. शेतकऱ्यांच्या पेन्शनसाठी कोल्हापूर ते नागपूर अशी संघर्ष यात्रा त्यांनी काढली. अॅड. भोसले यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारा आक्रमक नेता मिळाला असल्याचे बोलले जात आहे.
 
Top