वैराग (महेश पन्‍हाळे)  भारत सरकार आणि महाराष्‍ट्र शासन यांच्‍या उपक्रमांतर्गत वैराग मधील ओम महा ई सेवा सार्वजनिक सुविधा केंद्रामार्फत मराठा व मुस्लिम जातीचे आरक्षित जात प्रमाणप वैरागचे सरपंच संतोष निंबाळकर यांच्‍या हस्‍ते वाटप करण्‍यात आले.
     बार्शी तालुक्‍यातील वैराग तालुका होण्‍याच्‍या असलेले मोठे गाव असून सत्‍तावन्‍न गावांचा वैरागशी सतत संपर्क असतो मात्र वैरागमध्‍ये यापूर्वी कोणतीही सोय नसल्‍याने शासकीय सुविधांची कामे करून घेण्‍यासाठी तेवीस किलोमीटर अंतर कापून बार्शीला जावे लागत होते. आता वैरागसह सत्‍तावन्‍न गावांना बार्शीला जाण्‍याची गरज भासणार नाही. कारण वैरागमध्‍येच सोलापूर - बार्शी रोडवर शहाजीराव पाटील सांस्‍कृतीक भवना शेजारील नव्‍याने ओम महा ई - सेवा केंद्र महाराष्‍ट्र शासनाच्‍या उपक्रमांतर्गत सुरू करण्‍यात आले आहे. या केंद्रामार्फत विविध शासकीय योजनांतर्गत नव्‍याने लागू झालेल्‍या आरक्षणाप्रमाणे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड, उत्‍पन्‍नाचे दाखले, सात - बारा उतारा, रहिवाशी दाखले, सर्वप्रकारचे प्रतिज्ञा पत्र याशिवाय भारत सरकारच्‍या राष्‍ट्रीय पेन्‍शन योजना, उम्‍मीद रोजगार, पॅन सुविधा, बॅकिंग सेवा, स्‍वालंबन योजना आदी कामकाज करण्‍यात येत आहे. वैराग व परिसरातील सत्‍तावन्‍न गावातील विद्यार्थी नागरिक यांचा वेळ, श्रम, पैसा यांच्‍यात मोठी बचत होणार आहे.सध्‍या या महा ई सेवा केंद्रामार्फत मराठा व मुस्लिम नागरिकांना आरक्षित जात प्रमाणपत्र देण्‍यात येत आहे.या सेवेचा प्रारंभ सरपंच संतोष निंबाळकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. यावेळी पं. स सदस्‍य भाऊसाहेब काशिद,नानासाहेब धायगुडे, वैजिनाथ आदमाने, दिलीप खेंदाड, महा ई- सेवा केंद्राचे व्‍यवस्‍थापक जगन्‍नाथ आदमाने, चंद्रकांत तावस्‍ककर, महेश पन्‍हाळे, आप्‍पा दळवी, भास्‍कर शिखेर, गणेश मचाले, शाहुराजे निंबाळकर, महेंद्र लोंढे, सचिन पाणबुडे, किरण वाघमारे, वैभव खेंदाड, भाऊसाहेब जाधव, गणेश वाघमारे आदी मान्‍यवर उपस्थित होते.
 
Top