वैराग (महेश पन्‍हाळे)  6 सप्‍टेंबर 1971 साली पडलेल्‍या भीषण दुष्‍काळामध्‍ये वैराग येथील राजकीय धान्‍य गोदामावर तत्‍कालीन . आमदार चंद्रकांत नाना निंबाळकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली जनतेने मोर्चा काढला होता. त्‍यावेळी झालेल्‍या  गोळीबारात वैराग परिसरातील आठ जणांना हौतात्‍मय  पत्‍कारावे लागले. त्‍यामुळे रोजगार हमीचा कायदा अस्तित्‍वात आल्‍याचे सांगितले जाते.  या घटनेला 43 वर्ष पूर्ण झाल्‍याने त्‍यांच्‍या स्‍मृतीला   जागविण्‍यासाठी जनतेने मुक मोर्चाद्वारे हुतात्‍मा स्‍मारकाजवळ एकत्रित येवून हुतात्‍म्‍याना अभिवादन करण्‍यात आले.
    वैराग परिसरात 1971 साली  भयानक दुष्‍काळ पडला होता लोकांना ना काम, ना दाम, ना पोटासाठी धान्‍य नव्‍हते, मात्र  वैरागच्‍या धान्‍य कोठारात पुष्‍कळ धान्‍य साठवलेले होते. हे तत्‍कालीन आमदार निंबाळकर यांना समजल्‍यानंतर कष्‍टकरी सामान्‍य जनतेच्‍या सहकार्याने धान्‍य कोठारावर मोर्चा काढला.  मोर्च्‍यात हाताला काम द्या, कामाला दाम द्या, दामाला धान्‍य द्या अशी मागणी करण्‍यात आली. आपल्‍या न्‍याय हक्‍कासाठी भंडणा-या जनतेवर तत्‍कालीन जिल्‍हा अधिकारी डेमला याने बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात  एकनाथ जोती साळुंके (वैराग), इब्राहिम चॉंदसो शेख (वैराग),  . सौ. सुदराबाई लक्ष्‍मण चव्‍हाण (वैराग), बब्रुवान तुळशीराम माळी (मानेगाव),  भास्‍कर बाबूराव वाळके (मानेगाव), रघुनाथ श्रीपती माने (रातंजन), उध्‍दव श्रीपती गोफण (हळदुगे), चर्तुभूज विठ्ठल ताकभाते (श्रीपतपिंपरी)असे आठ जण  हुतात्‍मा झाले.   यांच्‍या बलीदानानंतर महाराष्‍ट्रामध्‍ये सर्वसामान्‍यांसाठी रोजगार उपलब्‍ध करण्‍याची प्रक्रिया वेगवान बनली आणि रोजगार हमीचा कायदा उदयास आला. यासाठी वि. स. पागे यांची समिती गठीत करण्‍यात आली होती. वैरागने महाराष्‍ट्रातील तमाम सर्वसामान्‍यांसाठी रोजगार हमीचा कायदा अस्तित्‍वात आणण्‍यासाठी शासनास भाग पाडले पुढे हाच महाराष्‍ट्राचा कायदा म्‍हणून देशभर लागू करण्‍यात आला. वैरागकररांचे त्‍याग, बलिदान ,शौर्याची आहूती नेहमी प्रेरणादायी ठरावी म्‍हणून वैरागचे सरपंच संतोष निबांळकर यांनी किर्ती स्‍तंभ निर्माण केला आहे. आज या ठिकाणी अभिवादन सभा आयोजित करण्‍यात आली होती. या सभेमध्‍ये सरपंच संतोष निंबाळकर, उपसभापती केशव घोगरे, मा. सभापती बापूसाहेब बुरगुटे, जीवाजीराव पाटील, मोहन घोडके, कॉ. पंडित माने, विनायक भोसले, सुभाष डुरे-पाटील, शेळगाव सरपंच वासुदेव गायकवाड, सुर्डीचे सरपंच दादासाहेब डोईफोडे,, पं. स. सदस्‍य भाऊसाहेब काशिद, कृष्‍णा काशिद, सुखदेव जगताप, वैजिनाथ आदमाने, कल्‍याण गायकवाड आदींसह नागरिक उपस्थित होते.
 
Top