बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर ) दुष्काळ व गारपिटीच्या नैसर्गीक आपत्तीमधील शेतकर्‍यांसाठी शासनाच्या वतीने अनुदानाचे वाटप करण्यात आले. बार्शी तालुक्याला भरघोस निधी मंजूर करण्यात आला, परंतु तालुक्यातील ३६ गावांतील शेतकर्‍यांना यामधून वंचित ठेवण्यात आल्याने या गावातील शेतकर्‍यांनी बार्शी तहसिलसमोर लाक्षणिक उपोषण केले आहे.
बाभळगाव, कोरेगाव , खडकोणी, चुंब, मांडेगाव, खडकलगावख्‍ पिंपळगाव (आ.), बजलगाव, लाडोळेख्‍ मुगंशी, (आर.), आळेरास, धामणगांव, पिंपरी (पा.), हळदुगे, नांदणी,  गौडगाव, रऊळगाव, संगमनेर, पुरी , झहानपुर , घाणेगाव, साकत, तावडीख्‍ शेलगाव, अरणगाव, कारी, मानेगाव, काळेगाव , उंडेगाव, इर्ले, इर्लेवाडी, ढोराळेख्‍ शेंदरी, कव्‍हे , बळेवाडी या 36 गावांना वंचित ठेवण्‍यात आले आहे.  दष्‍काळ निधीतुन वंचित राहिलेल्‍या गावांना अनुदान मिळण्‍यासाठी राहुल भड यांच्‍यासह विविध ग्रामस्‍थानी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.  
 
Top