नळदुर्ग - हगलूर (ता. तुळजापूर) येथील राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे ग्रामपंचायत सदस्‍य हनुमंत श्रीहरी घुगे व सौ तुळसाबाई व्‍यंकट घुगे यांनी  पालकमंत्री मधुकरराच चव्‍हाण यांच्‍या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्‍यांसह कॉग्रेस (आय) मध्‍ये जाहिर प्रवेश केला. 
          तुळजापूर विधानसभा मतदार संघात पालकमंत्री मधुकरराव चव्‍हाण यांची ताकद दिवसे दिवस वाढत चालली आहे मधुकरराव चव्‍हाण यांनी या मतदार संघात मोठया प्रमाणात विकासाची कामे केली आहेत.  या मतदार संघातील इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया सेख्‍येने पालकमंत्र्यांच्‍या नेतृत्‍वावर विश्‍वास ठेवून कॉंग्रेस मध्‍ये प्रवेश करित आहेत. दि. 13 सप्‍टे्रबर रोजी हगलूर ग्रामपंचायतीचे  राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे ग्रामपंचायत सदस्‍य हनुमंत घुगे व सौ. तुळसाबाई घुगे यांनी पालकमंत्री मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या उपस्थितीत कॉंग्रेसमध्‍ये जाहिर प्रवेश केला. यावेळी त्‍यांच्‍यासोबत संतोष घुगे, संतोष नागरगोजे, उमेश घुगे, दत्‍तात्रय नागरगोजे, संदिप जाधवर, दत्‍तात्रय घुगे, आप्‍पा घुगे, बालाजी घुगे, राजेंद्र राठोड, राजेंद्र पवार, सुनिल पवार, तानाजी व्‍हनमाने, , आनंदा दराडे, यांच्‍यासह शेकडो कार्यकर्त्‍यांनी कॉंग्रेसमध्‍ये प्रवेश केला. ग्रा.प सदस्‍य हनुमंत  घुगे व सौ तुळसाबाई  घुगे, यांच्‍यासह त्‍यांच्‍या समवेत कॉंग्रेसमध्‍ये प्रवेश केलेल्‍या सर्व कार्यकर्त्‍यांचे पालकमंत्री मधुकरराव चव्‍हाण यांनी स्‍वागत करून त्‍यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी हगलूरचे सरपंच अंकुश घुगे, उपसरपंच राजपाल पवार, पोलिस पाटील नितीन पाटील, हगलूर कॉंग्रेस शाखेचे अध्‍यक्ष नागनाथ घुगे, रमाजी घुगे, आदिजन उप‍स्थित होते.
 
Top