जळकोट (संजय रेणुके)   तुळजापूर तालुक्‍यातील जळकोट येथे गणेश मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असुन  श्रीराम नगरमधील श्रीराम गणेश मंडळाने अन्‍य गणेश मंडळाच्‍या तुलनेत रक्‍तदान शिबीर आयोजन करून  स्‍तुत्‍य असा उपक्रम राबविल्‍याने सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
    राज्‍यभर गणशत्‍सोव मोठया धुमधडाक्‍यात साजरा केला जात आहे. विविध गणेश मंडळाकडून अनेक समाजोपोयोगी उपक्रम राबले जातात. सदर उपक्रमातून समाजातील अनेक गरजवंतांना त्‍याचा लाभ मिळतो. तर मंडळाच्‍या कार्यकर्त्‍यांना समाजाच्‍या गरजा काही अंशी का होईना पूर्ण करू शकलो हे आत्‍मीक समाधान यातून मिळत असते. त्‍याचीच थोडीशी उतराई म्‍हणून  श्रीराम गणेश मंडळाने रक्‍तदान शिबीर घेवून जवळपास 40 बाटल्‍या रक्‍त  संकलन करण्‍याचा  स्‍तुत्‍य उपक्रम तर राबविलाच शिवाय रक्‍ताची गरज असलेल्‍या 40 रूग्‍णांचे प्राण वाचविण्‍याचे सत्‍कार्यही केल्‍याने सर्वत्र  आभिनंदन केले जात आहे. सदर रक्‍त संकलन करण्‍यासाठी उमरगा येथील श्रीकृष्‍ण रक्‍तपेढीचे गंगाधर हंचाटे, योगेश सोनकांबळे, सुर्यकांत कुर्ले, शिराज इनामदार, सदानंद माने, यांनी सहकार्य केले.
    तत्‍पुर्वी शिबीराचे उदघाटन माजी जि.प. सदस्‍य गणेश सोनटक्‍के यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी उपसरपंच बंकट बेडगे, विमुक्‍त जमाती संघटनेचे जिल्‍हा सरचिटणीस संजय माने, मंडळाचे अध्‍यक्ष प्रदिप मिरजे, उपाध्‍यक्ष अनिल माने, सचिव ज्ञानेश्‍वर साखरे, मार्गदर्शक सदस्‍य संतोष वाघमारे, बबन मोरे, रमेश राठोड, दयानंद बेडगे, आनंत मोटे, रूपेश स्‍वामी, विलास चव्‍हाण, धोंडिबा कागे, आदींनी  रक्तदान शिबीर यशस्‍वी करण्‍यासाठी परिश्रम घेतले .
 
Top