उस्मानाबा - शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे दि. 13 ऑगस्ट 2014 अन्वये ग्रामीण भागातील कळंब तालुक्यातील रांजणी व उमरगा तालुक्यातील आलूर येथे  (ऊर्दु) माध्यमाच्या नवीन माध्यमिक शाळा विनाअनुदान तत्वावर सुरु परवानगी देण्यात येणार आहे.
    इच्छुक व पात्र शैक्षणिक संस्थांकडून  विहित प्रपत्रात ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्जासाठी संकेतस्थळ http://newschooolsanctions.maharashtra.gov.in  या संकेतस्थतावर ऑनलाईन अर्ज 20 सप्टेंबरपर्यंत करावेत. अर्ज केल्यानंतर त्यासेाबतच्या कागदपत्राच्या छायांकित प्रती सांक्षाकित करुन प्रस्ताव दोन प्रतीत दि. 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांचेकडे जमा करावेत, असे आवाहन  शिक्षणाधिकारी (मा), जि. प उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top