नळदुर्ग  -  विधानसभा निवडणुक लढविण्‍यासाठी इच्‍छुक असणा-या धनदांडग्‍या मंडळींना जनतेच्‍या कामासाठी आमदार व्‍हायचे नाही? त्‍यांची संपत्‍ती वाचविण्‍यासाठी त्‍यांना आमदार व्‍हायचे आहे अशा स्वार्थी मंडळीपासून जनतेने सावध राहावे असे अवाहन राज्‍याच्‍याचे परिवहन मंत्री तथा उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचे पालकमंत्री मधुकरराच चव्‍हाण यांनी नळदुर्ग येथे आयोजित सभागृह बांधकाम शुभारंभ प्रसंगी  केले.
     नळदुर्ग  शहारातील  मराठा गल्‍ली येथे 10 लाख रूपये खर्चाचे सभागृह  ना. मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या प्रयत्‍नामुळे मंजूर झाले आहे. या सभागृहाच्‍या बांधकमाचा शुभारंभ शुक्रवार रोजी ना. चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.यावेळी ते बोलताना पुढे म्‍हाणाले की, सर्व जाती धर्माचा विकास करणे हे कॉंग्रेसचे ध्‍येयधोरण आहे. त्‍यानुसार आम्‍ही तालुक्‍यात विकासाची कामे करित आसताना कधीच जाती पातीचा भेदभाव केला नाही. सर्वांचा विकास करण्‍याचा आम्‍ही प्रामाणिकपणे प्रयत्‍न केला. विकास कामातूनच माणसे जोडता येतात. गेल्‍या विधानसभा निवडणुकीत तुळजापूर विधानभा मतदार संघाला नव्‍याने जोडलेल्‍या 72 गावातून मला इतर उमेदवारांपेक्षा 10 हजार मते कमी मिळाली होती. मात्र गेल्‍या पाच वर्षात या ठिकाणी मोठया प्रमाणात विकासाची कामे मी केली असल्‍याने त्‍यांनी यावेळी सांगितले. ऐतिहासिक स्‍थळांचा विकास करण्‍याचे काम आपण केले आहे. नळदुर्ग शहराचा सर्वांगीण विकास करण्‍यात आला असून जनतेनी  येणा-या विधासभा निवडणुकीत आपल्‍याला या विकास कामाची पावती द्यावी , सध्‍या या मतदार संघात अनेक धनदांडग्‍या मंडळीनी विधानसभा निवडणुक लढविण्‍याची तयारी सुरू केली आहे. यामध्‍ये या मंडळीचा स्‍वार्थ असून केवळ धनदांडग्‍या मंडळींना आपली संपत्‍ती  वाचविण्‍यासाठी कवच हवे आहे. अशा स्‍वार्थी मंडळीपासुन या मतदार संघातील जनतेनी सावध राहवे, असेही शेवटी ना. मधुकरराव चव्‍हाण यांनी सांगितले
  यावेळी नगराध्‍यक्षा मंगल सुरवसे, उपनगराध्‍यक्षा सुप्रिया पुराणिक,नगरसेविका अपर्णा बेडगे, नगरसेवक , शब्‍बीर सावकार, नितीन कासार शहबाज काझी, इमाम शेख, , महिला कॉंग्रेस कमिटीच्‍या माजी तालुका अध्‍यक्ष सुभद्रा मुळे, शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्‍यक्ष नवाज काझी, जिल्‍हा कॉंग्रेस कमिटीचे सरविटणीस प्रा. जावेद काझी, तुळजाभवानी कारखान्‍याचे माजी संचालक अख्‍तर काझी, कमलाकर डुकरे, माजी नगरसेवक शरीफ शेख, सुधीर हजारे, दत्‍तात्रय दासकर, कॉंग्रेस सेवा दलाचे माजी जिल्‍हाध्‍यक्ष रणजीतसिंह ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते मारूती खारवे, माजी नगरसेविका अर्चना डुकरे, आदीजण उपस्थित होते. यावेळी प्रारंभी मराठा गल्‍ली येथील शिवशाही तरून गणेश मंडळाच्‍या गणपतीची ना. मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते आरती करण्‍यात आली. यानंतर सर्व मान्‍यवरांचा मंडळाचे अध्‍यक्ष अमोल सुरवसे यांच्‍यासह कुलवंत मुळे, सुहास येडगे, सुधीर हजारे, प्रमोद जाधव, संतोष मुळे, राहूल गायकवाड, सौ. विमल काळे, यांनी सत्‍कार केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार शिक्षक सेलचे जिल्‍हाध्‍यक्ष संजय दळवी यांनी केले
 
Top