पांगरी - आत्या म्हणाल्याचा राग मनात धरून आठ जणांनी मिळून तिघांना कु-हाडीने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना शुक्रवारी  रोजी उक्कडगाव ता.बार्शी येथे घडली.
    विलास मधुकर मुळे,अनिल विलास मुळे,व मधुकर गणपती मुळे तिघेही रा.उक्कडगाव अशी कु-हाड हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे असून दिपक बजरंग मुळे,प्रकाश श्रीरंग मुळे,बजरंग मुळे,सुभाष दिपक मुळे,श्रीरंग महिपती मुळे,सिंधुबाई बजरंग मुळे,वच्छला श्रीरंग मुळे,भाग्यश्री प्रकाश मुळे,अशी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.
  जखमी विलास मधुकर मुळे वय 31 यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की काल ते त्यांच्या घरात असताना घरासमोरून त्यांची चुलती सिंधुबाई ह्या जात होत्या.तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांच्या चुलतीस आत्या म्हणून हाक मारली.मात्र याचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून आरोपी दिपक मुळे याने त्यांच्या हातातील कुर्‍हाडीने डोक्यात मारून जखमी केले.तसेच श्रीरंग मुळे व बजरंग मुळे यांनी फिर्‍यादीचे दोन्ही हात धरून हाताने लाठा बुकयांनी मारहाण करून पुन्हा आमच्या नाडी लागला तर हातपाय तोडण्याची धमकी दिली.तसेच इतर आरोपींनी त्यांची पत्नी अनीता व मधुकर यांना हाताने ,लाथा बुक्‍कयानी मारहाण करून जखमी केले.विलास मुळे यांच्या फिर्‍यादिवरून आठ जणावर  मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पांगरी पोलिस ठाण्याचे उप-निरीक्षक राजू राठोड हे करत आहेत.
 
Top