उस्मानाबाद -  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट-2014 चे वाढीव वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहेत. प्रवेशाच्या सहा फेऱ्या ऑगस्टमध्ये पुर्ण झाल्या आहेत. राज्यातील  आय. टी. आय. संस्थेमध्ये कांही व्यवसाय अभ्यासक्रमाच्या रिक्त राहिलेल्या जागाचा तपशिल www.dvetadmission.in  या संकेतस्थळावर  प्रसिध्द करण्यात आला आहे, असे प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
रिक्त जागेवर सर्व नोंदणीकृत परंतु औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कोणत्याही व्यवसाय अभ्याक्रमात प्रवेश न घेतलेल्या उमेदवारांना नव्याने विकल्प देण्याची संधी देण्यात आली असून ते उमेदवार 6 सप्टेंबरच्या सायंकाळी 6 वाजेपर्यात नवे विकल्प सादर  करु शकतील. विकल्प प्रवेश अर्जामध्ये बदल करण्यासाठी एडिटची सोय आहे. प्रवेशोच्छुकांनी जास्तीत जास्त विकल्पाची नेांद करावी. प्रवेशासाठी निवड फक्त गुणवत्तेच्या आधारे करण्यात येतील. सातव्या व आठव्या प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमदेवारांनी  प्रवेश घेणे बंधनकारक आहे. प्रवेश न घेतल्यास उमदेवारास पुन्हा प्रवेशाची संधी देण्यात येणार नाही  याची नोंद घ्यावी.
इयत्ता 10 वी पात्रता असलेल्या उमेदवाराजवळ इयत्ता 8 वी ची गुणपत्रिका नसल्यास व त्यांना 8 वी पात्रतेचे व्यवसाय निवडावयाचे असल्यास स्वतंत्र फॉर्म एडिट करण्याची सोय आहे. आठवीची यादी संपल्यानंतरच 10 वी पात्रतेच्या उमेदवारांचा विचार करण्यात येईल.
सातवी प्रवेश फेरी गुणवत्तेवर आधारीत असून महाराष्ट्र राज्यातील तदनंतर राज्याबाहेरील व शेवटी अनिवासी भारतीयांमधुन संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रसिध्द करण्यात येईल. सातव्या प्रवेश फेरीसाठी  निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी प्रवेश घेणे बंधनकारक आहे प्रवेश न घेतल्यास त्यांना पुन्हा संधी देण्यात येणार नाही.
आठवी प्रवेश फेरीसाठी फक्त गुणवत्तेवर आधारीत असून सातव्या प्रवेश फेरीतील रिक्त जागावर प्रतिक्षा यादीतील उमेदवारांमधून संस्था व व्यवसाय निहाय निवड यादी संकेतस्थळवर 12 सप्टेबर रोजी सकाळी 8 वाजता प्रसिध्द करण्यात येईल. सातव्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मुळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही 12 सप्टेंबरच्या सकाळी आठ पासून ते दि. 13 सप्टेंबरच्या सायंकाळी 5 वाजेपर्यत करण्यात यईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी  प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.                                     
 
Top