उस्‍मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील गणेश मंडळे, जयंती उत्सव समित्या व सामाजिक संघटनांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले आहे.
 गेल्या १० वर्षांपासून जिल्हा पत्रकार संघ विविध स्पर्धांचे आयोजन करीत आहे. यात शिस्तबध्द गणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धा, गणेशोत्सवातील उत्कृष्ट देखावा स्पर्धा आणि सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रम स्पर्धेचा समावेश आहे. शिस्तबध्द श्री. गणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धेत १० हजार रूपयांचे प्रथम परितोषिक संजय मंत्री यांच्यावतीने, द्वितीय ७ हजार रूपये डॉ. सचिन देशमुख तर तृतीय क्रमांकाचे ५ हजार रूपयांचे पारितोषिक महेश पोतदार यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. तसेच ३ हजार रूपयांची उत्तेजनार्थ चार पारितोषिके डॉ. धीरज वीर, राज ढवळे, ऍड. राघवेंद्र बोधलेे आणि अनंत आडसूळ यांच्यावतीने देण्यात येणार आहेत. विजेत्या गणेश मंडळांना रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
 
श्रीगणेशोत्सव आरास (देखावा) स्पर्धेत १० हजार रूपयांचे प्रथम पारितोषिक संतोष शेटे यांच्याकडून, द्वितीय ७ हजार रूपये डॉ. दिग्गज दापके यांच्याकडून आणि तृतीय क्रमांकाचे ५ हजार रूपयांचे पारितोषिक शरद जाधव यांच्यावतीने देण्यात येणार आहे. तसेच ३ हजार रूपयांची उत्तेजनार्थ दोन पारितोषिके पी.आर.काळे व प्रशांत पाटील यांच्यावतीने देण्यात येणार आहेत. विजेत्या गणेश मंडळांना रोख परितोषिकासह सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. वर्षभर सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविणारी गणेश मंडळे, विविध जयंतीउत्सव समित्या तसेच सामाजिक संस्था, संघटनांच्या उल्लेखनिय कार्याची दखल घेण्यासाठी सामाजिक उपक्रम स्पर्धेचे आयोजन पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले आहे. सामाजिक उपक्रम स्पर्धेसाठी माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने प्रथम पारितोषिक १० हजार रूपये, द्वितीय ७ हजार व तृतीय ५ रूपये व उत्तेजनार्थ ३ हजार रूपयांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
 
Top