उस्मानाबाद - राज्याचे परीवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते उस्मानाबाद तालुक्यातील विविध गावात विकासकामांचा शुभारंभ आज करण्यात आला. 
     राज्य शासनाने गेल्या 5 वर्षात अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. या योजनांचा लाभ जिल्ह्यातील अनेक गावांना मिळाला आणि लोकांच्या गरजेशी निगडीत कोट्यवधी रुपयांची विकासकामे आपल्या जिल्ह्यात झाली, असे प्रतिपादन श्री. चव्हाण यांनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना केले.
परिवहनमंत्री तथा पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते उस्मानाबाद तालुक्यातील कामेगाव, येवती, दाऊतपूर, सांगवी, टाकळी बेंबळी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ  करण्यात आला. सांगवी  येथे 3 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण तसेच नवीन रस्त्याचे भूमीपूजन, येवती  येथे  5 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे उदघाटन, कामेगाव येथे पेयजल योजनेचे भुमीपूजन, दाऊतपूर येथे 80 लाख रुपये खर्चाच्या पेयजल योजनेचे भुमीपूजन, नितळी येथे 5 लाख रुपये खर्चाच्या सभागृहाचे उदघाटन यावेळी करण्यात आले. विविध ठिकाणी पालकमंत्री चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी जि. प. सदस्य सुधाकर गुंड, पंचायत समिती सदस्य सोनटक्के, विश्वास शिंदे, ब्रिजलाल मोदाणी, संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, नितीन बागल, सिद्धार्थ बनसोडे, धनंजय रणदिवे, नाना निंबाळकर, दिलीप जावळे यांच्यासह संबंधित गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top