उस्मानाबाद - जिल्हा उद्योगकेंद्र, उस्मानाबाद पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे युवक-युवतीं व महिलांसाठी मोफत तांत्रिक प्रशिक्षण  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
    सोमवार, दि. 17 सप्टेंबर  ते 16 ऑक्टोबर या कालावधीत फुल शेतीवर आधारीत उद्योजक विकास  विकास प्रशिक्षण, उस्मानाबाद येथे,  मंगळवार, दि. 16 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत, फॅशन डिझायनिंग व रेडिमेट गारमेंटचे प्रशिक्षण भुम तालुक्यातील ईट येथे आणि  ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण, परंडा येथे, आणि वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे फॅशन डिझायनिंग व रेडिमेड गारमेंटसचे प्रशिक्षण गुरुवार, दि. 18 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
    सदरील प्रशिक्षण सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांसाठी असून  या प्रशिक्षणाचा संबधितानी लाभ घ्यावा. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अधिक माहिती व प्रवेश अर्जासाठी  तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती कार्यालय व ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत कार्यालय येथील कार्यक्रम आयोजक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र व कनिष्ठ प्रकल्प अधिकारी एमसीईडी, उस्मानाबाद यांनी केले आहे
 
Top