नळदुर्ग -   ऐतिहासिक नळदुर्ग किल्ला सोलापुराच्‍या युनिटी मल्टीकॉन कंपनीला दहा वर्षांसाठी देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन पुरातत्त्व विभाग युनिटी यांच्यात नुकताच याबाबतचा करार करण्यात आला. पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे पर्यटनवृद्धीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नळदुर्ग टुरिझम स्पॉट म्हणून नावारूपाला येईल.
       युनिटी मल्टीकॉन  कंपनीचे व्‍यवस्‍थापकीय संचालक कपिल मौलवी यानी बोलताना सांगितले की, राज्‍याचे 'सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे,  पालकमंत्री मधुकर चव्हाण, पुरातत्त्व विभाग महाराष्ट्राचे संचालक संजय पाटील, भारत जैन, जयधवल शहा, अनिल पाटील यांच्या उपस्थित मुंबई येथे बीओटीच्या या करारावर सहय्या करण्यात आल्या आहेत. नळदुर्गचा हा ऐतिहासिक किल्ला प्राचीन असून या किल्ल्यामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.
येथील नर-मादी धबधबा हा पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरतो. बीओटीच्या माध्यमातून किल्ल्यामध्ये अत्याधुनिक उद्यान, बालगोपाळांसाठी खेळणी, रोझ गार्डन तसेच लेझर शोच्या माध्यमातून किल्ल्याचा इतिहास मांडण्याबरोबर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. युनिटीला हा किकल्ला बीओटी तत्वावर चालवण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे नळदुर्गवासीयांचा व्यापार वाढणार आहेच. यामुळे शहरातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळण्यासही मदत होणार आहे.
 
Top