बार्शी (मल्लिकार्जुन धरूरकर)  येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी शाखा बार्शी संचलित शहरात प्रथमच स्पर्धा परिक्षांचे तयारी करणार्‍या विद्यार्थीसाठी मोफत स्पर्धा परिक्षा ग्रंथालय व अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन शुक्रवार दि.१२ रोजी सांयकाळी ५ वा. सौ.प्रभावती सुरेशचंद्र कुंकूलोळ शिशु विकास केंद्र, सुभाष नगर बार्शी येथे आय.ए.एस. अधिकारी (झारखंड) रमेश घोलप यांच्या शुभ हस्ते होणार असल्याची माहिती इंडियन रेड क्रॉस चे उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांनी दिली.
         या उद्घाटन प्रसंगी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव, आय.पी.एस अधिकारी संजय खरात,सचिन भोसले आय.एफ.एस. , प्रशांत अमृतकर डी.वाय.एस.पी. सोलापूर ग्रामीण, प्राचार्य शिवपूत्र धुत्तरगाव, रोटरी क्लब अध्यक्ष गौतम कांकरिया व तहसीलदार बालाजी सोमवंशी आदि उपस्थित राहणार आहेत.
    बार्शी शहरात प्रथमच मुंबई,पूणेच्या धर्तीवर ग्रामीण व शहरी भागातील स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी विविध प्रकारची स्पर्धा पुस्तके साठी सुसज्य ग्रथांलय व अभ्यासिका केंद्र सुरु करण्यात येणार आहे. तसेच वेळोवेळी येथे तंज्ञाकडून मार्गदर्शन होणार आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारची सुविधा नसल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या अनेक विद्यार्थीना लाखो रुपये खर्च करुन शहरी भागाकडे जावे लागत होते. मात्र इंडियन रेड क्रॉस सोसायटी , शाखा बार्शीच्या वतीने निशुल्क सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थीची सोयची होणार आहे.    तसेच स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यार्‍या विद्यार्थी व विद्यार्थींची या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहण्‍याचे  आवहान डॉ.काका सामनगावकर यांनी केले.
 
Top