वैराग (महेश पन्‍हाळे)   सोशल मिडीयाच्‍या माध्‍यमातून  निसर्गाची कुस फुलवण्‍याची, सोशल मिडीयाच्‍या आधारे अनोळखी तरूणानी एकत्रीत येवुन हजारो बिया, व शेकडो रोपे वेग-वेगळ्या ठिकाणी लावून  वेगळी ओळख निर्माण केली आहे.
    लक्षावधी रपये खर्च करून शासन झाले लावा, झाले जगवा, हा नारा देत आहे, पण प्रत्‍यक्षात झाडे किती लावली, किती जगली आणि कागदोपत्रीच किती वाढली हे सर्वश्रुत आहे. कुणाच्‍या दबावाखली वृक्षारोपण करण्‍यापेक्षा मनापासून वृक्षारोपन करून उत्‍तरदायित्‍व पेलण्‍याची क्षमता प्रत्‍येकाच्‍या अंगी वाढणे महत्वाचे आहे. आसाच एक प्रयत्‍न वैराग भागामध्‍ये पाहायला मिळाले . कोणत्‍याही कार्यक्रमाचे निमित्‍त नाही, केवळ निसर्ग संवर्धन वृध्‍दी करण्‍याच्‍या शुध्‍द हेतूने विष्‍णु तुपे यांच्‍या माध्‍यमातून डॉ. सुहास मोरे, प्रविण देशमुख, निरंजन पाटील, योगेश हजारे, अमोल नागटिळक, शशिकांत चव्‍हाण, श्रीकांत देशमुख, उत्‍कर्ष दुरे, सोमेश्‍वर पुराणिक, विजय राउत, लक्ष्‍मण पवार, श्रीकांत कापसे, शशिकांत भंगुरे, प्रमोद इंगळे, नितीन अतकरे, नानासो देशमुख, यांनी सोशल मिडीयाद्वारे एकत्र येवून तीन गट तयार केले. विशेष म्‍हणजे या गटामध्‍ये काहीजण ओळखीचे तर काहीजण अनोळखीं युवकांचा सामावेश आहे. मात्र सर्वांचा उद्देश वृक्षवृध्‍दी असल्‍याने समविचार एकत्र जमले त्‍यांनी गुलमोहर सिताफळ, अशोक बेहडा, हिरडा, या बियांची लागवड केली तर चिंच, गुलमोहर, करंजी, सुबाभुळ, पिंपळ या रोपांची लागण हिंगणी (आर) च्‍या यमाई मंदीर परिसरामध्‍ये केली. यापूर्वी उस्‍मानाबाद येथील प्राचीन लेण्‍यांच्‍या परिसरामध्‍येही बियांची लागण करण्‍यात आली होती. निसर्गाकडून नेहमीच काहीना काही घेण्‍याचा मानवी प्रवृत्तीमध्‍ये काहिसा बदल  घडवत निसर्गांची बिया रोपांनी ओटी भरण्‍याचे काम चला निसर्गाकडे' या उपक्रमाद्वारे हे ध्‍येय वेडे करित आहेत. याच उपक्रमामध्‍येच अधिकांधिक युवकांचा सहभा्ग करून घेण्‍यासाठी सोशल मिडीयावर ही माहिती प्रसारीत करण्‍यात आली. त्‍याला दिडशे जणानी उस्‍फुर्तपणे पाठिंबा देवुन सहभागी होण्‍यास सहमंती दर्शवली आहे. ज्‍या सोशल मिडीयाने राजकीय क्षेत्रात भुकंप घडविला त्‍याच सोशल मिडीयातून आता नैसर्गिक बदलाचे वारे घडत आहे. शासनाच्‍या कोटयावधी रूपयांच्‍या खर्चातून जो बदल घडला नाही तो बदल युवकांच्‍या निस्‍वार्थी भावनेतुन होणार आहे. त्‍यामुळे सर्व स्‍तरातून या चला निसर्गाकडे उपक्रमाचे जोरदार स्‍वागत होत आहे.
 
Top