पांगरी( गणेश गोडसे ) शिक्षक दिनाचे औचित्‍य साधून शुक्रवार  दि.5 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शिक्षकासह विद्यार्थ्यांना केलेल्या संबोधनाचा पांगरीसह परिसरातील अनेक गावातील हजारो विद्यार्थ्‍यांनी  लाभ घेतला.मात्र दुपारी भाषण सुरू होताच पावसास सुरुवात झाल्यामुळे विजेचा लपंडाव सुरू होऊन भाषण ऐकताना व्‍यत्‍य येत होता.टि . व्हि पाहणार्‍यांची घोर निराशा झाली.लहान सहान गोष्टी मधूनही देश सेवा करता येते, त्यासाठी सीमेवर जाण्याची गरज नाही,यासह वीज बचत,सफाई आदि मुद्दे बालकांना चांगलेच भावल्याचे भाषणानंतर दिसून येत होते.
 पांगरी येथील सर्वोदय विद्या मंदिर व महाविद्यालयात रेडियोसह लॅपटॅप या साधनाद्वारे मोदींचा संदेश विद्यार्थापर्यंत पोचवण्यात आला.या प्रशालेतील 700 विद्यार्थ्यांनी भाषणाचा लाभ घेतला.यावेळी शशिकांत नारकर,बापू नारकर,अशोक मुंढे,प्रतीक नरकर,यांच्यासह पालक हजर होते.
 पांगरी येथील जि.प.केंद्रीय मुली,मुले,उर्दू,या तिन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशालेच्या प्रांगणात दूरदर्शन संच ठेऊन मोदींचे भाषण दाखवण्यात आले.यावेळी 441 मुले-मुली हजर होते.
पांगरिसह उक्कडगाव येथे 141,कारी येथे 287 पांढरी येथे 48,चिंचोळी येथे 34,गायकवाड वस्ती येथे 29,ढेंरेवादी येथे 20,घोळवेवाडी येथे 24,टोणेवादी येथे 08,जानपूर येते 20,व ममदापुर येथे 102 जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्‍यांनी पंतप्रधानांच्या भाषनाचा लाभ घेतला.यावेळी केंद प्रमुख गायकवाड,मुख्यद्यापक .काशीद,मुंढे,माने,सय्यद,खान,आदि हजर होते॰
 
Top