उस्‍मानाबाद - जिल्हा शिवसेनेच्या वतीने  गुरुवार दि . ११ सप्टेंबर  रोजी उस्‍मानाबाद  येथील हातलाई मंगल कार्यालयात सकाळी ११.३० वाजता निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांनी दिली.
     जिल्हा शिवसेनेच्या वतीने शहराजवळ असणा-या हातलाई मंगल कार्यालयात सकाळी   साडेअकरा वाजता निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना उपनेते  खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर, शिवसेना उपनेते  डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह नितीन बानगुडे - पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहितीही देण्‍यात आली . आयोजित  निर्धार मेळावा पक्षाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील शिवसेनेच्या आजीमाजी पदाधिका-यासह उपजिल्हाप्रमुख, सर्व तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, गटप्रमुख यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर परिषद सदस्य, शिवसेनेचे सर्व सरपंच, सहकारी संस्थाचे चेअरमन व शिवसेनाअंतर्गत विविध आघाड्याचे जिल्हा व तालुका पदाधिकारी
 
Top