नळदुर्ग - येथिल  इतिहास प्रसिध्‍द किल्‍ला दहा वर्षाकरिता सोलापुर येथिल युनिटी मल्‍टीकॉन प्रा. ली. या कंपनीला बीओटी तत्‍वावर देण्‍याचा शासनाने निर्णय घेतला आहे. युनिटी मल्‍टीकॉन प्रा.लि. कंपनीचे प्रमुख कपिल मौलवी हे किल्‍ल्‍यास गतवैभव प्राप्‍त करून देतील, अशी अपेक्षा पालकमंत्री चव्‍हाण व नळदुर्ग शहरवासीयातुन व्‍यक्‍त केली जात आहे.
       या महत्‍वपुर्ण निर्णयामुळे नळदुर्ग शहराच्‍या विकासात भर पडून पर्यंटकास आधिक चालना मिळणार आहे. तर बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्‍याबरोबरच शहरातील व्‍यवसायात वाढ होणार आहे. नुकतेच शासनाबरोबर युनिटी मल्‍टीकॉन व पुरातत्‍व विभागात हा महत्‍वपुर्ण करार झाला आहे.
       नळदुर्ग येथिल ऐतिहासिक किल्‍ला  प्राचीन असून या किल्‍ल्‍यात अनेक प्रेक्षणिय स्‍थळे आहेत. या किल्‍ल्‍यातील नयनरम्‍य नर - मादी धबधबा पाहण्‍यासाठी राज्‍यासह परप्रांतातुन लक्षावधी पर्यंटक दरवर्षी किल्‍ल्‍यास भेट देतात. मात्र याठिकाणी येणा-या पर्यंटकासाठी सुविधा नसल्‍याने किल्‍ला पाहण्‍यासाठी येणा-या पर्यंटकाना मोठी कसरत करावी लागते.त्‍यामुळे पर्यटकातुन नाराज व्‍यक्‍त केली जात असे. त्‍याचबरोबर नर-मादी धबधबा सुरू  असतानाच किल्‍ला पाहण्‍यासाठी पर्यटकंची अक्षरशा रिघ लागते , मात्र इतर वेळी किल्‍ला पाहण्‍यासाठी येणा-या पर्यटकांची संख्‍या कमी राहत असे. या किल्‍लयात  मुलभूत सुविधाचा अभाव असल्‍याने हा किल्‍ला पाहण्‍यासाठी येणा-या पर्यटकांची मोठी निराशा होत होती. त्‍यामुळे हा किल्‍ला एखाद्या संस्‍थेला भाडेतत्‍वावर चालविण्‍यास देवून किल्‍ल्‍यात विविध प्रकारची विकासकामे करून पर्यटकांना मुलभूत सुविधा उपलब्‍ध करून द्याव्‍यात, जेणेकरून 12 महिने या किल्‍ल्‍यात पर्यटकांची गर्दी राहिल, अशा प्रकारचा प्रस्‍ताव शासनाकडे गेल्‍या 10 वर्षापासून रेंगाळत पडला होता. मात्र पालकमंत्री चव्‍हाण यांनी शासन दरबारी प्रयत्‍न करून हा किल्‍ला भाडेतत्‍वावर चालविण्‍यास द्यावा याकरिता प्रयत्‍न  केले. त्‍यांच्‍या प्रयत्‍नांमुळे एक आठवडयापुर्वी  शासनाने 10 वर्षासाठी सोलापूरच्‍या युनिटी मल्‍टीकॉन प्रा. लि कंपनीला हा किल्‍ला बीओटी  तत्‍वावर चालविण्‍यासाठी देण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे येथे मोठ्या प्रमाणात विकासाची कामे होणार असुन किल्‍ला पाहण्‍यासाठी येणा-या पर्यटकांना याठिकाणी  सर्व सुविधा उपलब्‍ध होणार असल्‍याने वर्षभर पर्यटकांची गर्दी होईल. त्‍यामुळे शहरातील बाजारपेठेत कायमची गर्दी राहण्‍याबरोबरच  बेरोजगार युवकांना विविध माध्‍यमातून या ठिकाणी रोजगारही उपलब्‍
 
Top