बार्शी- महसूल खाते केवळ वसूली करणारे खाते नसून निधीचे वाटप करणारे राजस्व खाते देखिल आहे. नैसर्गिक आपत्तीत शासन व प्रशासन खंबीरपणे सामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहते असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांनी केले
      महसूल विभागाच्या बार्शी तहसिल कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उदघाटन व लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष रमेश पाटील, आमदार दीपक साळुंखे, जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण गेडाम, अधिक्षक अभियंता श्रीकांत जोशी, उपविभागीय अधिकारी शहाजी पवार, तहसिलदार बालाजी सोमवंशी, उपनगराध्यक्षा सौ.अरूणा परांजपे, राष्ट्रवादीचे गटनेते नागेश अक्कलकोटे, अरूण कापसे, करंद निंबाळकर, डॉ.बी.वाय.यादव, डॉ.मधुकर फरताडे, नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.
 ना.सोपल म्हणाले, अतिवृष्टी, गारपिट व दुष्काळीस्थितीच्या प्रसंगी जिल्ह्यासाठी ६०० कोटींचा निधी मिळाला असून त्याचे वाटपही झाले आहे. बार्शी तालुक्याला सुमारे १०० कोटी रूपयांचा निधी मिळाला असून महसूल खात्याच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी यावेळी मोलाची साथ दिली. बार्शी तालुक्याचा वाढता विस्तार लक्षता घेऊनच बार्शी तहसिल कार्यालयाची जुनी इमारत अपुरी असल्याने २००९ मध्ये आमदार झाल्यानंतर बार्शी तहसिलच्या नूतन इमारतीसाठी प्रशासकीय मान्यता घेतली. तब्बल १ कोटी ३२ लाख रूपये खर्चाची इमारती मागील काही महिन्यात युध्दपातळीवर काम करत तळ मजला व पहिला मजल्याचे काम पूर्ण झाले. उर्वरित कामासाठीची निधी विधानसभा निवडणुकीनंतर आणून तहसिलदारांचे नूतन निवासस्थान व संपूर्ण इमारतीचे काम पूर्णात्वास येईल.बार्शी तालुक्यातील जनतेचा वेळ व पैशाची बचत व्हावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ.गेडाम यांनी लवकरात लवकर बार्शीसाठी प्रांताधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशी सूचनाही यावेळी सोपल यांनी केली. बार्शी तालुक्यात विकास कामांचा वेग वाढला असून हाच वेग व प्रगती कायम ठेवण्यासाठी महसूल खात्यानेही नवीन प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून जनतेची कामे पारदर्शीपध्दतीने व वेळेवर पूर्ण क रावीत अशी अपेक्षाही यावेळी सोपलांनी व्यक्त केली. आमदार श्री.साळुंखे, जिल्हाधिकारी डॉ.गेडाम, तहसिलदार बालाजी सोमवंशी, श्रीकांत जोशी, पाटील शहाजी पवार,नागनाथ माळवदकर यांनीही मनोगत व्यक्त केले. फोटो ओही : बार्शी तहसिल कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन करतांना पालकमंत्री दिलीप सोपल,यावेळी जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण गेडाम, आमदार दिपक साळुंखे, शहाजी पवार, नगराध्यक्ष रमेश पाटील, तहसिलदार बालाजी सोमवंशी, पोलीस निरीक्षक सालार चाऊस, नगरसेवक ज्योतिर्लिंग कसबे. याप्रसंगी बोलतांना ना.सोपल
 
Top