उस्‍मानाबाद -  मुस्‍लीम  व मराठा समाजास जात प्रमाण प्रत्र देण्‍यास टाळा - टाळ होत असुन याप्रकरणी न्‍याय देण्‍याची मागणी  ऑल इंडिया मजलीस - ए ईत्‍तेहाद उल मुसलीमीन संघटनेचे  उस्‍मानाबाद  जिल्‍हाध्‍यक्ष अकबरखान पठाण यानी जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे निवेदनाद्वारे केली  आहे.
      शासनाच्‍यावतीने मुस्‍लीम व मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्‍यात आले होते. यांचा उपयोग घेण्‍यासाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्‍यक असुन शासनाने सुरूवातीला आरक्षण जाहीर झाल्‍यानंतर जात प्रमाण पत्र देण्‍याबाबत प्रशासनाला आदेश दिले होते. सेतु मार्फत हे काम सुरळीत चालु होते ,पण अचानक जातप्रमाणपत्रासाठी देण्‍यासाठी  जाचक अटी लावण्‍यात येत आहे. त्‍यामुळे संतूचे संचालक म्‍हणतात की साहेबांना भेटा आमचे यात काही नाही, एकी‍‍कडे शासनाचे महाराष्‍ट्रामध्‍ये मोठया प्रमाणात नोकरी भरती निघाली आहे व यामध्‍ये मुस्‍लीम व मराठा समाजाला आरक्षणानुसार पद दिले आहे परंतू दोन्‍ही समाजाच्‍या लोकांना जातीचे  प्रमाणपत्र मिळत नाही आणि जवळपास चार ते पाच हजार प्रकरण धुळखात पडले आहे या दोन्‍ही समाजाचे फार मोठे नुकसान होत आहे. तरी याप्रकरणी  लक्ष देऊन हा  प्रश्‍न मार्गी लावावे व मुस्‍लीम मराठा समाजाला योग्‍य न्‍याय मिळवून द्यावे. असे नमूद करण्‍यात आले आहे,
 
Top