उस्मानाबाद-  जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय,ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धेच्या सुधारित तारखा खालील प्रमाणे आहेत.
    मैदानी (शालेय) वयागट 14,17 आणि 19 मुले/मुली,स्पर्धेचा कालावधी दि. 23 ते 24 सप्टेंबर,2014. मैदानी (महिला) 25 वर्षखालील महिला,26 सप्टेंबर, 2014. व्हॉलीबॉल (शालेय) वयोगट 14,17 आणि 19 वर्ष मुलांसाठी 13 सप्टेंबर तर मुलींसाठी 14 सप्टेंबर,2014. टेनिस व्हॉलीबॉल (शालेय) 17 व 19 मुले/मुली,दि.18 सप्टेंबर,2014. फुटबॉल (शालेय) 17 व 19 मुले/मुली, दि. 18 सप्टेंबर,2014 आणि रोप स्किपीग (शालेय)-17व 19 मुले/मुली कालावधी दिनांक 27 सप्टेंबर,2014 असा असून या स्पर्धेचे स्थळ             श्री तुळजाभवानी स्टेडियम, उस्मानाबाद असे आहे.  
    वरील तारखेच्या बदलाची नोंद जिल्ह्यातील सर्व शाळा/महाविद्यालये/संस्था यांनी घेऊन आपले संघ/खेळाडू संबंधित तारखेस सकाळी 10 वाजता उपस्थित ठेवावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजीव कुलकर्णी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री. गणेश पवार (भ्रमणध्वनी क्रमांक 9970095315) यांच्याशी संपर्क साधावा.
 
Top