उस्‍मानाबाद - येथील तेरणा नागरी सहकारी बँकेची 18 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 10 सप्‍टेंबर रोजी बँकेच्‍या सभागृहात संस्‍थापक अध्‍यक्ष तथा राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्‍यक्ष जीवनराव गोरे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत व चेअरमन अॅड. बाळासाहेब पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली  संपन्‍न झाली. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी गिरीधर इंगळे व व्‍यवस्‍थापक अनुरथ भोंग यांनी अहवाल वाचन करून सभासदांच्‍या प्रश्‍नांना उत्‍तरे दिली. या वार्षिक सभेतील सर्व विषयांना सर्वानुमते मंजूरी देण्‍यात आली.
    यावेळी तेरणा नागरी सहकारी बँकेत कोअर बँकिंग प्रणालीचे उदघाटनही जीवनराव गोरे यांच्‍या हस्‍ते झाले. त्‍यामुळे बँकेच्‍या उस्‍मानाबाद, कळंब व भुम येथील बँक ग्राहकांना कोणत्‍याही शाखेतून रक्‍कम काढता व भरता येईल. या दोन्‍ही कार्यक्रमास बँकेचे व्‍हाईस चेअरमन परवेज हक्‍क, संचालक विठ्ठल कुलकर्णी, प्रल्‍हाद धत्‍तुरे, शिवाजी मोरे, शिवाजी कदम, प्रा. शशिकांत पंखे, मंगल शेळवणे, पद्मीनी वाघमारे, दादासाहेब सोनारीकर, तात्‍यासाहेब गोरे, महेमुद पटेल, कराळे आप्‍पा, भा. न. शेळके, अंकुश जगताप, बी.सी. घोडके, सुभाष पाटोळे, महादेव पेठे, राजाभाऊ तेरकर, सुधाकर देशमुख, यांच्‍यासह सभासद व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
 
Top