उस्‍मानाबाद - महाराष्‍ट्र ज्‍युदो संघटनेच्‍या अधिपत्‍याखाली दि उस्‍मानाबाद डिस्‍ट्रीक्‍ट ज्‍युदो असोसिएशनच्‍यावतीने ''छायादिप लॉन्‍स'' उस्‍मानाबाद येथे दि. 5 ते 7 सप्‍टेंबर  दरम्‍यान आयोजित 42 व्‍या राज्‍यस्‍तरीय सब ज्‍युनिअर (मुले-मुली) ज्‍युदो स्‍पर्धेत 10 सुवर्ण, 10 रौप्‍य, 4 कास्‍य पदक पटकवित विजेतेपदी तर ठाणे संघाने 8 सुवर्ण, 3 रौप्‍य, 4 कास्‍य पदके पटाकावित उपविजेतेपद मिळवले.
    विजेते व उपविजेते संघास महाराष्‍ट्र ज्‍युदो संघटनेचे अध्‍यक्ष अॅड धनंजय भोसले, सचिव दत्‍ता आफाळे, दि उस्‍मानाबाद डिस्‍ट्रीक्‍ट ज्‍युदो असोसिएशनचे अध्‍यक्ष नितीन काळे, सचिव प्रविण गडदे, कोषाध्‍यक्ष अभय वाघेलीकर, तुरूंग अधिकारी राजेंद्र मरळे यांच्‍या हस्‍ते चॅम्पियनशिप ट्रॉफी  देवून सन्‍मानीत करण्‍यात आले. यावेळी टोर्नामेंट डायरेक्‍टर योगेश धाडवे, राज्‍य तांत्रिक सचिव शैलेश टिळक, राज्‍य ज्‍युदो संघटनेचे कोषाध्‍यक्ष रवी मेटकर, राज्‍य कार्यकारणीचे पदाधिकारी सतिश पहाडे, अर्चना केवाळे, जिल्‍हा ज्‍युदो संघटनेचे सहसचिव अशोक जंगमे, सदस्‍य मोहन कुलकर्णी, राजेश बिलकुले, रणजित रोकडे, प्रताप राठोड, किरण शानमे, सतिश साळुंके, आदिची प्रमुख उपस्थिती होती.
  जिल्‍ह्यात प्रथमच पार पडलेल्‍या या सपर्धेच्‍या निमित्‍ताने राज्‍यातील 22 मुलांच्‍या अशा एकुण 44 संघामधुन 15 वर्षाखालील 450 खेळाडू 50 पंच, व्‍यवस्‍थपक, प्रशिक्षक, अधिकारी यांनी सहभाग नोंदविला. 
          बेस्‍ट ज्‍युदोकाने सन्‍मानीत
   दरम्‍यान सदर स्‍पर्धेत उत्‍कृष्‍ट कामगिरी करणा-या 10 खेळाडूंना बेस्‍ट ज्‍युदोका या पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. यात 11 वर्षाखालील मुलीत ठाण्‍याची सायना देशपांडे, मुलांत औरंगाबादचा राज जंगमे, 12 वर्षाखालील मुलीत नगरची नयना माने, मुलात ठाण्‍याचा निहाल गायकर,, 12 वर्षाखालील मुलीत सोलापूरची कुमुदनी सावंत, नगरचा आदित्‍य दोपावकर, 14 वर्षाखालील मुलीत अमरावतीची ऋतीका ठमे तर मुलात सांगलीचा प्रणव पाटील, 15 वर्षाखालील वयोगटात मुंबईची साक्षी तर पुण्‍याचा आशि'ष मारणे यांचा सामावेश्‍ा आहे  स्‍पर्धा यशस्‍वी करण्‍यासाठी राज्‍य आणि जिल्‍हा ज्‍युदो संघटनेच्‍या पदाधिकारी, खेळाडू यांनी पुढाकार घेतला. 
 
Top