पांगरी( गणेश गोडसे) 'थकल्या डोळ्यांची स्वप्न आता फोडू लागलीत मुकट टाहो,म्हातारपणाची काठी तुम्ही लेकर आतातरी त्यांच्याकडे पहा हो'ही कोण्या कवीची घरातील वडीलधार्‍यासाठी केलेले काव्य समाजाला खूप काही सांगून जाते.मात्र समाज त्याचा बोध घेतो का हा प्रश्न आज ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमिताने समोर आला आहे.घरातील  नव्हे तर समाजातील ज्येष्ठ नागरिकांची समाज व कुटुंबच अवहेलना करते अशी असलेली ओरड खरोखरच लक्षवेधी असून आजच्या युगात ज्येष्ठ नागरिक दिनी तरी याचा विचार व्हावा अशी त्यांची मागणी नसली तरी मनोमन ईच्छा आहे.
   काळ बदलतोय तसा मानुसही रंग बदलतोय.ज्यांनी त्याला तलहातातील फोडाप्रमाणे जपून लहणाचे मोठे करत त्याचे शिक्षण,दैनंदिन गरजा पूर्ण करन्यासाठी आपल्या गरजा इच्छा आकांक्षा,अपेक्षा यांची होळी करून मुलांना व कुटुंबातील सदस्यांना घडवण्यासाठी आपले आयुष्य वेचले अश्या घरातील बुजूगांना आज घरातून समाजातून दिली जाणारी वागणूक सज्ञानी विचारसरनिवाल्याना  विचार करावयास लावणारी आहे.पण मनाने व विचाराने कमकुवत झालेल्या समाजातील देशाच्या भावी पिढीला हा विचार करण्यास वेळ नाही.
 ज्येष्ठ नागरिकांच्या अवहेलनेला खरी सुरुवात ही घरातूनच व आपल्याच जवळच्या मांनसातून होते असा निसकर्ष बाहेर आला आहे.दुरावत चाललेल्या माणुसकीमुळे आज कुटुंब,घर,समाज,हितसंबंध, नातेसंबंध इतिहासजमा होऊ पहात आहे.याला जबाबदार कोण,हे कोणामुळे घडते आदीचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्या घरातील शेजारील ज्येष्ठ नागरिकाशी कसे वागतो याचा विचार केला तरी आपण कसे वागले पाहिजे याचा अंदाज येऊ शकतो व याचे उत्तर मिळू शकते॰
    वय वाढलेली,व्याधीमुळे त्रस्त झालेली,घरातील कोणत्याही कामाला हातभार लागत नसलेली,घरच्या एका कोनाड्यात निपचीत  पडून असलेली,अश्या व्यक्ती घरातील कर्त्यांना डोक्यावर बोजा झाल्यासारखे होऊन जाते.मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य,आर्थिक,सामाजिक,निवास,सुरक्षा आदि समस्यांची सोडवणूक करून त्यांचा वृद्धापकाळात शारीरिक क्षमता वाढवणे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
आयुष्याची सुरुवात उगवत्या सूर्याप्रमाणे होते,सुगरणीच्या खोप्याप्रमाणे कुटुंब विणले जाते मात्र हे करता करता आयुष्याची संध्याकाळ केव्हा होते हे त्या कुटुंबप्रमुखालाच कळत नाही व तेथूनच त्याची ससे हेलपट सुरू होते.त्याला कुटुंबात असलेला मान आदर आपलेपानाची जाणीव हळू हळू कमी होताना दिसते.कालांतराणे त्याच कुटुंब प्रमुखाला वृद्धाश्रमाची वाट दाखवली जाते.जे कधी स्वप्नातही आले नसेल त्याचा सामना करून आयुष्याची भयंकर संध्याकाळ त्याला अनुभवावी लागते.त्यांच्याकडे असलेल्या अनुभवाचा व न्यानाचा फायदा मात्र घेताला जात नाही.ज्येष्ठाचा आदर्श समोर ठेऊन त्यातून नव समाजनिर्मिती करण्यासाठी समाजातील म्होरक्याकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत.त्यांचे विचार,आचार आदीची शिदोरी कायम सांभाळली पाहिजे.मात्र याचे भान आजची आधुनिक नावाची पिढी ठेवते का हा मुददा आहे.
  शासन ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप काही करत असल्याचा आव आणत असले तरी तो सागळीकडूनच दुर्लक्षित होत आहे.ज्येष्ठ नागरिकांना शाशनाच्या विविध योजनातून मिळणार्‍या पैशावर घरातून नजर ठेऊन ते पैशे ज्येष्ठाच्या खिसातून काढून घेतले जातात यापेक्षा दुर्दैव काय.ज्येष्ठ नागरिकांची अवहेलना का केली जाते हा चिंतनाचा विषय आहे.
 सगे सोयरेच ज्येष्ठाच्या जिवावर: संपत्ती,पैसा,जमीन,जुमला आदि कारणावरून घरातूनच ज्येष्ठाना संपवण्याचा घाट घातला जातो.ज्येष्टाच्या हत्येत महाराष्ट्र देशात तिसर्‍या स्थानी आहे.भारतात ज्येष्ठ नागरिक हा समाजावरील एक बोजाच मानला जाऊ लागला आहे.काही अपवाद वगळता अशीच स्थिती सगळीकडे निदर्शनास येते.
  शासकीय सवलतीतही अवहेलना: शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना विविध सोई,सुविधा,सवलती,एस.टी.बस सवलत,रेल्वे सवलत,बँक,आदि विविध योजना दिल्या जातात.मात्र ज्या ठिकाणी या सवलती त्यांना दिल्या जातात तेथे मात्र ज्येष्ठाना अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जाते.तेथे त्यांच्याकडे अगदी संकुचित नजरेने पाहिले जाते.समाजाची ही प्रवृती बदलणे काळाची गरज आहे.शासनाकडून दिल्या जाणार्‍या सुविधा ह्या आपल्याच खिशातून दिल्या जात असल्याचा आव अधिकारी ज्येष्ठासमोर आणतात.
 
Top