उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूरतर्फे  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र  परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून या परीक्षेसाठी  व अधिक माहितीसाठी मंडळाचे www.mahahsscboard.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ‍अधिकृत छापील वेळापत्रक माहिती उपलब्ध करुन देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी  वेळापत्रकासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय मंडळ, लातूरचे  विभागीय   सचिवांनी केले आहे.
 परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखणे व परीक्षासंचालन सुयोग्य प्रकारे व्हावे, यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसराचे ‍व्हीडिओ चित्रीकरण,शासकीय  अधिकारी यांनी परीक्षा केंद्रांना आकस्मीक भेटी देवून  उपाययोजना करण्यात करतील. परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येतील. विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरप्रकाराच्या प्रलोभनांना बळी पडु नये, काही अडचण असल्यास त्‍यांनी विभागीय मंडळाच्या हेल्प लाइनव्दारे मार्गदर्शन/ समुपदेशन मिळावावे. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेचे विषय, गुण, प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा, भाषा,प्रश्नसंचिका आदिसाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा,असे  आवाहन विभागीय मंडळ, लातूरचे  विभागीय   सचिवांनी केले आहे
 
Top