उस्मानाबाद - तुळजापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 स्वीप 2 अंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले असून कलापथकाच्या माध्यामातून मतदार जनजागृती करण्यात आली. ज्या गावात मतदानाची टक्केवारी कमी आहे, अशा गावातून मतदानाचे महत्व मतदान करणे हा आपला हक्क आहे, याची जाणीव, जागृतीसाठी पोवाडे, गीते, घोषवाक्य, पथनाटयाच्या माध्यमातून केशेगाव, अनसुर्डा, आंबेवाडी, महाळंगी, चिखली, साराळो बु , दारफळ, राजूरी , कामेगाव , समुद्रवाणी , पाडोळी  आदि गावातून मतदान जनजागृती करण्यात आली.
          तुळजापूर येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली यात 10 शाळेतील 16 विद्यार्थींनीनी सहभाग नोंदवून मतदान जनजागृतीचा संदेश रांगोळीच्या माध्यमातून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी.घुगे यांनी दिली.
    तसेच नळदुर्ग येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात 10 शाळेतील 225 विद्यार्थी व 35 शिक्षक सहभागी झाले होते. जनजागृती मोहिम यशस्वीतेसाठी कल्याण सोनवणे, कक्ष प्रमुख व शिवाजी  वेदपाठक यांनी विशेष परिश्रम घेतले.
 
Top