उस्‍मानाबाद -  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हयातील  स्वयंसहायता महिला गटानी तयार केलेल्या मालाच्या प्रदर्शन व विक्रीकरीतादि. 16 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत आद्या दिपावली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. या  कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा प्रमुख  न्यायाधिश सुरेंद्र तावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक   अभिषेक ‍त्रिमुखे,‍उपस्थित राहणार आहेत.
येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आद्या दिपावली हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना या प्रदर्शनास भेट देवून बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाचे /वस्तुची मोठ्या प्रमाणात खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे  प्रकल्प संचालक, उस्मानाबाद यांनी केले आहे.                               
स्वयंसहायता गटांनी विविध प्रकारची उत्पादने तयार  
 केल्याने त्यांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करुन देवून त्यांच्या वस्तुंची  विक्री  व्हावी व त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी  हा या प्रदर्शनच्या  आयोजनाचा उद्देश आहे. दिवाळी सणासाठी लागणाऱ्या पणती, आकाश कंदिल, फराळाचे पदार्थ, रांगोळी असे    विविध उत्पादने उपलब्ध राहणार आहेत असेही कळविण्यात आले आहे.   
 
Top