तुळजापूर -  श्री. तुळजाभवानी मंदिरात मंगळवारी रोजी नवरात्रोत्‍सावातील  सहाव्या मोळेदिनी मंदिराच्‍या गाभा-यात शेषनाग अवताराची पुजा मांडण्‍यात आली होती तर भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती.
      तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत असुन मंगळवारी भवानी मातेचा वार असल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. मंगळवार दि. ३० रोजी सुमारे तीन ते चार लाख भाविकांनी देविदर्शन घेतले. देवी दर्शनार्थ भाविकांचा ओघ रात्री १ वाजल्यापासुन दिवसभर गर्दी मोठ्या प्रमाणावर होती. 
     

भाविक रात्री १ वाजल्यापासुन देवी दर्शनार्थ मंदिरात गर्दी करत आहेत. श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशासह देशातील ठिक-ठिकाणचे भाविक मोठया संख्येने दाखल झाले होते. मंगळवारी रोजी भाविकांचे अभिषेक संपल्यानंतर श्री. भवानी मातेस वस्त्रो अलंकार चढविण्यात आले. त्यानंतर आरती होवून सिंहासनावर शेषनाग अवताराची महापुजा मांडण्यात आली. दि. १ रोजी बुधवारी सातव्या माळे दिवशी सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज यांना आशिर्वाद रुपी भवानी तलवार देताना भवानी माता अलंकार महापुजा मांडण्यात येणार आहे.  मंगळवारी रात्री १ वाजता चरण तिर्थ होवून भाविकांसाठी दर्शनासाठी दरवाजे खुले करण्यात आली होती. स. ६ वा. अभिषेक पुजेस सुरुवात झाली. अभिषेकाच्या रांगा व धर्म दर्शन चे ५ ही हॉल व मुख दर्शन हॉल भाविकांच्या गर्दीने तुडूंब भरले होते.
 
Top