तुळजापूर - येथील काँग्रेसच्या प्रचार सभेत,  भाजप सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांना हटवून राष्ट्रपती राजवट लावली. तर   राज्यपाल बदलले, एवढेच नाही तर मुंबईतील आरबीआयचे कार्यालय दिल्लीला हलवले. मुंबईतील गोदी, बंदरे, गुजरातला पळवल्याचा आरोप करून कॉग्रेसच्‍या नेत्‍यानी  सेना, भाजप आणि राष्ट्रवादीवर चौफेर टिका करून  भाजपा व राष्ट्रवादीच्या छुप्या आघाडीवर मुख्यमंत्र्यांनी शाब्दिक हल्ला चढविला. तर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंची कायम भावी मुख्यमंत्री म्हणून संभावना केली.  
     तुळजापूर येथे हडको मैदानावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रचाराच्या शुभारंभाची सभा प्रचंड उत्साही वातावरणात पार पडली. जवळपास ४० ते ५० हजाराचा जनसमुदाय या सभेस उपस्थित होता. या सभेत उपस्थित असलेला जनसमुदाय पाहून काँग्रेस नेत्यांनाही स्फुरण चढले. आणि प्रत्येकांनीच सेना, भाजपा आणि राष्ट्रवादीवर प्रखर आसुड ओढले. त्याची सुरूवातच पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणातुन केली. राष्ट्रवादी हे आमच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट होते. त्यांच्या सोबत असताना आम्हाला कधी सुख लागले नाही. आता वेगळे झाल्याने सुटल्या सारखे वाटतेय असे म्हणत आता आम्ही आमची कुवत दाखवून देऊ. व चारही जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला. तर रजनीताई पाटील आणि बसवराज पाटील यांनी भाजपच्या अच्छे दिनवर टिकास्त्र सोडले. अच्छे दिन ऐवजी त्यांनी महागाईचे उंचे दिवस दाखविल्याचा आरोप केला. हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भाषणात बरे झाले आघाडी तुटली आता स्वबळावर जिंकून दाखवू असे म्हटले. देवीच्या आशिर्वादाने आम्ही स्वबळावर जिंकूच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे कायम स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त करत होते. त्यांचा तो विचार आज महत्वाचा वाटतो. राष्ट्रवादी सोबत नसल्याची चिंता नाही. उलट त्यांची आम्हाला अडचणच होती. १५ वर्षे आम्ही त्यांच्या सोबत होतो. आज त्यांचे बोलणे ऐकल्यावर आम्ही १५ वर्षे कुणाला सांभाळले याचे दु:ख वाटते. १५ वर्षे काँग्रेसचा कार्यकर्ता गुदमरून गेला. एककीडे असली राष्ट्रवादी तर दुसरीकडे कायदा न पाळता काळजी वाहू सरकारचे पत्र दिल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे सुडाचे राजकारण भाजपने केल्याचा आरोपही त्यांनी केला. तर पतंगराव कदम यांनी अनेक जिल्ह्यात आमचा हात गोठला होता. बरं झालं आघाडी मोडली. आता आम्ही मोकळे झालो. आता सर्वांना संधी मिळेल व आम्ही आमची ताकद दाखवून देऊ असे आव्हान दिले. तर अशोकराव चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे १५ वर्षात मनाप्रमाणे काम करण्यास मोकळीक नव्हती. राष्ट्रवादीने कायम स्पिडब्रेकरचे काम केले. आता कुणाच्यात किती दम आहे हेच पहायचेय असे खुले आव्हान दिले. तर भाजपाच्या फडणीसांवरही त्यांनी आरोप केले. हेच फडणवीस चव्हाण सरकारचे सर्व निर्णय रद्द करण्याच्या वल्गना करतात. याचा अर्थ ते मराठा, मुस्लिम आरक्षण रद्द करणार असे दिसते. त्यामुळे जनतेला निर्णायक मतदान करावे लागणार असे आवाहन केले.
नारायण राणे यांनी भाजप आणि शिवसेनेचे आपल्या भाषणातुन वाभाडे काढले. मोदी अनेक प्रकल्प गुजरातला पळवत असताना यांची तोंडे बंद का असा सवाल त्यांनी केला. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायची घाई झाली आहे. मात्र त्यांना आयुष्यात कधी मुख्यमंत्रीपद मिळणार नाही. कायम भावी मुख्यमंत्री म्हणून बिरूद लावूनच फिरावे लागणार असा टोला लगावला. फडणवीस तर बालीश आहेत. विधी मंडळात एखादा प्रश्न विचारणारा मुख्यमंत्री होण्याच्या लायकीचा होतोच असे नाही असेही ते म्हणाले. याशिवाय भाजपच्या भ्रष्ट संगतीवरही त्यांनी आरोप केला.
विलासरावांची आठवण
या सभेत सर्वच वक्त्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. मधुकरराव चव्हाण यांनी तर मागच्या वेळी विलासरावांच्या एका सभेमुळे मी जिंकून आलो असे सांगत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला तर अमित देशमुख, हर्षवर्धन पाटील, अशोकराव चव्हाण, नारायण राणे, सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपल्या भाषणामध्ये विलासरावांची आठवण आणि त्यांच्या कार्यकाळावर प्रकाश टाकला. 
     गोली का जवाब गोली से देंगे, अशी डरकाळी फोडणा-या नरेंद्र मोदींच्या खिशातून अजू

नही गोळ्या निघाल्या नाहीत. सीमेवर ५० वेळा गोळीबार झाला. मात्र, मोदी जपान, अमेरिकेत फिरत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी केली. लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाबद्दल वाभाडे काढतानाच भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी घाई झालेल्या नेत्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली.  
 
Top