नळदुर्ग -: राष्‍ट्रपीता महात्‍मा गांधी यांच्‍या जयंती निमित्‍त वागदरी ता. तुळजापूर येथील ग्रामपंचायत व जिल्‍हा परिषद प्राथमि‍क शाळेच्‍यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. 
  तुळजापूर तालुक्‍यातील वागदरी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्‍या प्रतिमेचे पुजन सरपंच राजकुमार पवार यांच्‍या हस्‍ते तर ग्रामसेविका श्रीमती.थोरात यांच्‍या प्रमुख उपस्थितीत करण्‍यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्‍थांनी पूष्‍पार्पण करून गांधीजींना अभिवादन करून गांधी जयंती निमित्‍त ग्राम स्‍वच्‍छता अभियान पर्यावरण व पाणी अडवा व पाणी जिरवा मोहिमेला सुरूवात केली. याप्रसंगी सरपंच राजकुमार पावार, सुकसिंग ठाकुर, जेष्‍ठ कार्यकर्ते शिवाजी मिटकर, महादेव बिराजदार, राजकुमार पाटील, किसन पाटील, एस.के. गायकवाड यासह आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रां.पं सदस्‍य, युवा कार्यकर्ते यांनी प्रत्‍यक्ष झाडू हातात घेवून मारूती मंदिर परिसराची स्‍वच्‍छता केली व साबनाने हात धुवून ग्रामस्‍वच्‍छतेचा संदेश दिला. याप्रसंगी आयोजित ग्रामसभेत ग्रामसेविका थोरात  ग्रामस्‍वच्‍छता पर्यावरण व पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेविषयी सविस्‍तर माहिती दिली. 
     त्‍याचबरोबर  जि.प. प्राथमिक शाळा  या ठिकाणी  गांधी जयंती व लाल बहादूर शास्‍त्री जयंतिनिमित्‍त विविध कार्यक्रम संपन्‍न झाले. शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिका महादेवी जथे यांच्‍या हस्‍ते महात्‍मा गांधीजी व स्‍वतंत्र्य देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्‍त्री यांच्‍या प्रति‍मेचे पुजन करण्‍यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्‍यांची भाषणे झाली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते एस.के. गायकवाड, शिक्षक बाळू महाबोले, विकास कुलकर्णी आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी हेलीकॅप्‍टर दुर्घटनेत शहीद झालेले हवाई दलाचे कॅप्‍टन अविनाश यशवंत सोमवंशी - पाटील यांना भावपूर्ण श्रध्‍दांजली वाहण्‍यात आली.  जयंती निमित्‍त शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेच्‍या परिसराची स्‍वच्‍छता केली.यावेळी शालेय व्‍यवस्‍थापन समितीचे अध्‍यक्ष सतिश बिराजदार, सहशिक्षक युवराज जाधव, आर.डी चव्‍हाण विक्रम मगतराव,  लक्ष्‍मण जाधव यासह विद्यार्थी  संख्‍येने उपस्थित होते. 

 
Top