तुळजापूर- तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आजही मोठया प्रमाणात बेरोजगारी आहे, तरुणाच्या हाताना काम नाही, तालुक्यात असणारा एकमेव सहकारी साखर कारखाना या लोकांनी बंद पाडला आणि हेच लोक आज बेरोजगारी हटविण्याच्या गप्पा मारत आहेत. तेव्हा या मतदार संघातील बेरोजगार तरुणाच्या हाताला काम मिळण्यासाठी या मतदारसंघावर शिवसेना भगवा फडकवण्‍याचे आवाहन तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे  उमेदवार  सुधीर पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातील मसला 
येथे केले.
      शिवसेनेचे उमेदवार सुधीर पाटील यांनी या मतदार संघातील २० ते २५ गावास भेट देवून  मतदारांशी संपर्र्क साधला. मसला येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीतही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले की, बेरोजगारी हटविण्याच्या घोषणा देवून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आत्तापर्यंत या जिल्ह्यातील बेरोजगार तरुणाची घोर निराशा केली आहे. बेरोजगार युवकांच्या हाताला काम तर नाहीच, पण या जिल्ह्यातील सहकारी संस्था बंद पाडण्याचा एककलमी कार्यक्रम या लोकांनी राबविला. आणि हेच लोक आज तरुणाच्या हाताला काम देण्याच्या गप्पा मारत आहेत. पण काँग्रेसवाल्यांनो लक्षात ठेवा, आत्ता यापुढे बेरोजगार, शेतकरी, तरुण तुमच्या थापांना बळी पडणार नाही. तरुणांनाची फसवणूक करणाNया या लोकांना धडा शिकविण्याची संधी या निवडणूकीच्या माध्यमातून आपणास मिळाली आहे. आणि खNया अर्थाने या जिल्ह्यातील व तालुक्यातील सुशिक्षीत बेकांराचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांच्या हाताला काम देण्यासाठी शिवसेना आपल्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे व राहिल तेव्हा येत्या निवडणूकीत तुमची फसवणूक करणाNया या नेत्यांना धडा शिकवण्यासाठी धनुष्यबानासमोरील बटन दाबून सेवेची संधी द्यावी व या मतदार संघावर बाळासाहेबांचे भगवा फडकविण्याचे स्वप्न पुर्ण करावे असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांचेही मार्गदर्शन झाले. सुधीर पाटील यांच्या या तालुक्यातील बैठकांना मतदारांनी भरभरुन प्रतिसाद दिला. तसेच सुधीर पाटील यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, सुनिल जाधव यांच्यासह या तालुक्यातील सिंदफळ, मसला, माळूंब्रा, सांगवी, पांगरधरवाडी, सुरतगाव, पिंपळा खुर्द, देवकुरळी, काटगाव, नांदूरी, कामेगाव, दिंडेगाव, टेलरनगर, इटकळ, केशेगाव, दहिटना, वागदरी, उळूप, खुदावाडी आदी गावात पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला.
 
Top