उस्मानाबाद -  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर यांच्यामार्फत मार्च 15 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र  इयत्ता 10 वी  परीक्षेस नियमित प्रविष्ठ होणाऱ्या विदयार्थ्यांची आवेदनपत्र ऑलनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असून त्याबाबतच्या तारखा व संकेतस्थळाबाबतची माहिती लवकरच जाहीर  करण्यात येणार आहे.
ऑक्टोंबर/ नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या सुटटीचा कालावधी असल्याने शाळांनी विदयार्थ्यांची आवेदनपत्र ऑफलाईन पध्दतीने शालेयस्तरावर भरावीत. ऑफलाईन आवेदपपत्रे भरण्यासाठी पूर्वीच्या आवेदनपत्रात बदल असल्याने मंडळाच्या संकेतस्थळावरुन पॅच डाउनलोड करुन तो दिलेल्या सूचनांप्रामणे ऑफलाइन सॉफटवेरकरीता रन करावे आणि त्यानंतर मार्च-2015ची ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही सुरु करावी.
मार्च-2015 च्या परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबत आवश्यक कार्यवाही शाळांनी आपल्या स्तरावर पूर्ण करुन ठेवावी, म्हणजे ऑनलाईन तारीखा जाहीर झाल्यावर आवेदपत्र अपलोड करणे सोयीस्कर होईल,  असे राज्यमंडळ, पुणेचे सचिवांनी  कळविले आहे.


 
Top