बार्शी (पांगरी) -   सभेला झालेल्या गर्दीमुळे सभेला तारुण्य आले आहे. विरोधकांची झोप उडल्याशिवाय राहणार नाही असे उदगार राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार  दिलीप सोपल यांनी काढले. यावेळी मोठया संख्येने शिवसेनेतून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. बाळासाहेब मोरे, दत्ता काकडे मित्र मंडळ, बजरंग मित्र मंडळ, हनुमंत जाधव, कल्याण जाधव, सुरेश देशमुख, हरिशचंद्र घावटे, सय्यद शेख, अफसद पठाण, दिगंबर चौधरी शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी घारी, पुरी, पांढरी, उक्कडगांव, कारी, या गावांच्या प्रचारा दरम्यान सोपल बोलत होते.
सोपल पुढे म्हणाले, रऊळगांव –ढेंबरेवाडी साठवण तलावाची मंजूरी तटकरे साहेबांकडून बैठक करुन मंजूर केलेले आहेत. एकाचवेळी आठ प्रकल्पाच्या ई-निविदा 27-08-2014 रोजी काढल्या आहेत. राजकिय भाषणे आपल्या माय भगीनी ऐकत असतात. एका छोटया  मुलीला कळाले कि भाषण कसे करायचे परंतु आमच्या विरोधकांना एकदा आमदार राहिले असताना सुद्धा कळत नाही. ते कोणत्या संस्कृतीमधून आले आहेत? त्यांना कसे कळणार असा प्रश्न सोपल यांनी उपस्थित केला. बार्शी उपसा सिंचन योजनेमुळे 22 गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. अनेक कुटूंबाच्या डोळयात आनंदाचे अश्रू आले. एकाही कामाचे मंजूरीशिवाय भूमी पूजन केले नाही. मी हसवून जाईल पण फसवून जाणार नाही. 100 कोटीचा गारपीठ, दुष्काळ निधी तालुक्यासाठी आणला. 97 गावांचा पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या. पांगरी – वैराग भागासाठी पुंण्याचे काम केले. येथे माझ्या विचाराची बॉडी नसताना सुद्धा इर्लेवाडी – बळेवाडी येथे कधीच योजना आली नसती. ती मी मंजूर केली. आम्ही केलेल्या कामाचे कुदळ मारायला विरोधक पुढे असतात या योजना मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या सहीची गरज नसते. याचा अधिकार कॅबीनेट मंत्री म्हणून सर्वस्वी माझाच आहे. व्यक्तीदाबाने पछाडलेले विरोधक यांना मतपेटीतून उत्तर देण्याचे तसेच तुलना करुन आपला माणूस कोण आहे असे आवाहन सोपल यांनी केले.
 
Top