उस्मानाबाद - जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद आणि परंडा या चार विधानसभा मतदार संघातील निवडणूक मतदानाची प्रक्रिया शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या संदर्भात संबंधित मतदार संघातील  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अंतिम प्रशिक्षण सत्र घेतले आहे. या निवडणूकीत मतदारांनी कोणत्याही प्रबोधनाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
        उमरगा विधानसभा मतदार संघात 2  लाख 81  हजार 680  मतदार असून त्यामध्ये 1  लाख 50  हजार 913  पुरुष मतदार तर 1 लाख 30 हजार 763 स्त्री मतदारांची संख्या आहे. शिवाय इतर 4 मतदार आहेत. उमरगा विधानसभा मतदार संघात 301  मतदान केंद्र आहेत.   तुळजापूर  विधानसभा मतदार संघात 3  लाख 30  हजार 165  मतदार असून त्यामध्ये 1  लाख 78  हजार 523  पुरुष मतदार तर 1 लाख 51 हजार 635 स्त्री मतदारांची संख्या आहे. शिवाय इतर 7 मतदार आहेत. तुळजापूर विधानसभा मतदार संघात 370  मतदान केंद्र आहेत. उस्मानाबाद विधानसभा संघात 3  लाख 26 हजार 384  मतदार असून त्यामध्ये 1  लाख 74  हजार 981  पुरुष मतदार तर 1 लाख 51 हजार 404 स्त्री मतदारांची संख्या आहे. शिवाय इतर 2 मतदार आहेत. उस्मानाबाद विधानसभा मतदार संघात 347 मतदान केंद्र आहेत.         
           परंडा विधानसभा संघात 2  लाख 94 हजार 258  मतदार असून त्यामध्ये 1  लाख 58  हजार 436  पुरुष मतदार तर 1 लाख 35 हजार 821  स्त्री मतदारांची संख्या आहे. शिवाय इतर 1 मतदार आहेत. परंडा विधानसभा मतदार संघात 343 मतदान केंद्र आहेत.         
    जिल्ह्यात एकूण 12 लाख 32 हजार 490 मतदार असून 6 लाख 62 हजार 853 पुरुष, 5 लाख 69 हजार 623 स्त्री  आणि इतर 14 मतदार आहेत.  या निवडणूक कामासाठी 7 हजार 040 अधिकारी /कर्मचारी  यांची नियुक्ती केली आहे.         
     मतदान कर्मचारी केंद्राध्यक्ष /सहा. केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व पडदा नशीन मतदान केंद्रावरील कर्मचारी, पोलीस अधिकारी  व कर्मचारी, पोलीस पाटील, ग्रामसेवक,  केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ, मायक्रो ऑब्झर्व्हर,क्षेत्रिय अधिकारी व मास्तर ट्रेनर तसेच संवेदनशिल मतदान केंद्रवर कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती दक्षता घेण्यात येणार आहे.
आता जाहीर प्रचार बंद  झाल्याने प्रशासनाने स्थिर सर्वेक्षण पथक, भरारी पथक, व्हिडीओ पथक यांना मतदानापर्यंत दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. कुठल्याही परिस्थिती आचारसंहिता भंग होणार नाही, याबाबत तात्काळ कार्यवाहीच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली  आहे.
 
Top