बार्शी (श्रीपतपिंपरी) -   लोकांची साथ असल्यानंतर तिकीटाची काळजी करायची नाही. ज्यांना लोकांची साथ नसते त्यांना तिकीटाची काळजी वाटते असे खडे बोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दिलीप सोपल यांनी प्रचार सभेत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किसन भाऊ ताकभाते, महादेव जाधव, आबा गोरे, सुरेश कापसे, आतिश गरदडे , जमीर मुलाणी बाबासाहेब काकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नागेश अक्कलकोटे, विक्रम सावळे, मिटू घाडगे, अब्बासभाई शेख, उपळाई चे सरपंच विजय ठोंगे, कमलेश तुपे आदी उपस्थित होते.
    सोपल म्हणाले, सर्वसामान्याचा सुख दु:खाची जाणीव मला माहित आहे. म्हणूनच खास बाब म्हणून कर्जे दिली. जिल्हा बँकेचा चेअरमन असताना नफ्यातून व्याजाचे पैसे भरलेले आहे. देशपातळीवरील इफकोचा निवडूण आलेल्या 21 संचालकांपैकी मी एक आहे. हमीभाव केंद्राची उभारणी केली. तूर, मका, हरभरा यांना चांगला हमीभाव मिळाला. विरोधक टिका करताना म्हणतात 50 कोटी यांनी हप्ता फेडरेशनचा येतो परंतु 5 कोटीच नफा आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या विरोधकांना हप्त्या शिवाय दुसरे माहीत नाही. सगळीकडे हप्ता खाण्यासाठी पांडू पाळतात अशा या विरोधकाच्या चोराच्या उलटया बोंबा आहेत. विरोधक काँग्रेसमध्ये असताना त्यांच्याच पक्षातील सहकार मंत्री असताना मागील पाच वर्षात संतनाथ कारखाना का चालू केला नाही. यशवंतराव चव्हाण म्हणाले होते राजकारण हे राजसपणे केले पाहीजे.
    पुढे नागेश अक्कलकोटे म्हणाले, बार्शी तालुक्याचे नाव जेव्हा निघते तेव्हा सोपल साहेबांची बार्शी असे नाव निघते. आम्ही कामाच्या माध्यमातून मत मागत अहोत. बार्शी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी किती संघर्ष करावा लागला हे मी स्वत: अनुभवले आहे. एक पाणीदार नेता म्हणून साहेबांची ओळख आहे. 97 गावात पाणी पुरवठयाच्या योजना मंजूर झालेल्या आहेत. आपल्या नेत्यांची पाठराखण केली पाहीजे. श्रीपतपिंपरी घोरवडी येथील सांडपाण्याचा उपयोग शेतीला कसा होईल याबद्दल साहेबांबरोबर चर्चा करत असतो लवकरच तोही प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही अक्कलकोटे यांनी दिली.
    सावळे म्हणाले, गावकुसावरील भांडणे बाजूला सारुन विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य द्यावे. तालुक्यातीक प्रत्येक गावातून सोपल साहेबांना लिड द्यावा हजारोंचे संसार उभे करणारे असे नेतृत्व होण्यासाठी तीन चार दशकातून एखादा लोकनेता घडत असतो. बार्शी भाग्य आहे असा लोकनेता सोपल साहेबांरुपी बार्शी तालुक्याला मिळाला आहे. तालुक्याला समृद्धी आणि सौख्य लाभणार दहा हजार खेडयांची लोकवर्गणी साहेबांनी माफ केली.
    सुरेश कापसे म्हणाले, बार्शी तालुक्यात हरीत क्रांती केली आहे. उपसा सिंचन सारख्या ऐतिहासीक योजनेमुळे 5 लाखापासून ते 6 लाखापर्यंत गावाला निधी मिळाला आहे.
    मिटू घाडगे म्हणाले, पाणी पुरवठा पेयजल योजनेअंतर्गत 27 लाखाचा निधी गावाला मिळाला आहे. समाज मंदीर, रस्ते यासाठी साहेबांनी आमदार कोटयातून निधी दिला आहे. (शिवसेनेमधून राष्ट्रवादी मध्ये अनेक कार्यकर्ते, ग्रुप दाखल झाले.)
 
Top