उस्मानाबाद - जिल्ह्यात विधानसभेच्या  निवडणूका 15 ऑक्‍टोंबरला मतदान, दि. 19 रोजी मतमोजणी, 21 ऑक्टोंबर रोजी दिपावली, 25 ऑक्टोबर रोजी भाऊबीज, 26 ऑक्टोंबर  रोजी मोहरम सण व उत्सव येत असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था  अबाधीत राहणेसाठी अपर जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी   मुंबई  फौजदारी प्रक्रीया संहिता 1951 चे कलम 37 (1) व  (3) अन्‍वये  संपूर्ण जिल्ह्यात 15 ऑक्टोंबरच्या सकाळी 6 पासून ते  29 ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपर्यंत  शस्त्रबंदी  व जमावबंदी आदेश जारी  केले आहेत. 
या आदेशान्वये शस्त्र, काठ्या, बंदूका, तलवारी, चाकू, रिव्हॉलर्व्हर  आदि शस्त्र जवळ बाळगता येणार नाहीत, शारिरीक इजा करणेस कारणीभूत ठरतील किंवा सहज बाळगता येतील, अशी वस्तु जवळ बाळगता येणार नाहीत. 
कोणतेही क्षार, द्रव्यपदार्थ, स्फोटके जवळ बाळगता येणार नाही, दगड, क्षेपणास्त्रे किंवा प्रवर्तक क्षेपणास्त्रे जवळ बाळगता येणार नाहीत किंवा ठेवता येणार नाही, वाहून नेता येणार नाहीत, आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नकला करता येणार नाहीत, सभ्यता किंवा नितीमता यास बाधा येईल,  अशी किंवा  अराजकता माजेल, अशी चित्रे, नकला, घोषणा फलके चिन्ह किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगता येणार नाहीत. 
तसेच व्यक्तीचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे,प्रतिमेचे प्रदर्शन करता येणार नाही, व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणून बुजून दु:खविण्याच्या उद्देशाने वादय वाजवता येणार नाही किंवा गाणी  म्हणता येणार नाहीत. जाहीरपणे प्रक्षोभक किंवा असभ्य वर्तणुक करता येणार नाही .
जिल्ह्याच्या कोणत्याही सडकेवर किंवा ‍सार्वजनिक ठिकाणी एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास किंवा मिरवणूका काढण्यास मनाई करण्यात आली आहे.
शासकीय कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासनाचे अधिकारी, कर्मचारी, अत्यंयात्रा, धार्मिक कार्यक्रमास हे आदेश लागू राहणार नाही. उक्त कालावधीत मिरवणूकांना  परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक ,मंडळ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना राहतील, याची संबधितांनी नोंद घ्यावी,  असेही आदेशात नमुद करण्यातआले आहेत. 

 
Top