बार्शी (खांडवी) -     उपसासिंचनचा एक टप्पा पूर्ण झालेला आहे. तालुक्याला जीवनदायी ठरणारी योजनेचे दुसर्‍या टप्प्याचे काम आपणच पूर्ण करु शकतो असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दिलीप सोपल यांनी प्रचार सभेत व्यक्त केला.
    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किसनराव माळी, पंचायत समितीचे सदस्य काळे, सुरेश कापसे, आप्पा पाटील, नानासाहेब ठाकरे, सुनिल पाटील, विक्रम सावळे, बाळासाहेब गव्हाणे, कोंडीबा गव्हाणे आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विनोद गव्हाणे, सागर कदम, उल्हास गव्हाणे, जानता राजा ग्रुप, सोपान ठाकरे, शेळके, महेश जाधव, रणजीत गव्हाणे, आनंद गव्हाणे, योगेश पाटील, भारत मांजरे, बाळासाहेब मांजरे, आदीनी प्रवेश केला.
    यावेळी सोपल पुढे म्हणाले, कार्यकर्ता हा एका पक्षाशी जोडला जातो तेव्हा तो त्या पक्षाच्या विचाराशी जोडला जातो. पोट भरण्यासाठी कट्टर कार्यकर्ता दुसर्‍या पक्षात प्रवेश करत नाही. जे पोट भरण्यासाठी पक्ष बदलतात त्याला कट्टर कार्यकर्ता म्हटले जात नाही. स्वत:च्या फायद्यासाठी उद्योगधंदे उभे केले म्हणजे समाजसेवा होत नाही. बारकल बडबड करण्याशिवाय विरोधकांना दुसरे काहीच जमत नाही. असा चिमटा सोपल यांनी काढला.
 
Top