उस्मानाबाद - जिल्ह्यातील प्रत्येक शाळेने गावागावात विद्यार्थ्यांच्या  श्रमदानातून एक वनराई बंधारा बांधला तर शेतकऱ्यांच्या कोरडवाहू  जमिनी ओलीताखाली येवून रब्बी    पिकांसाठी उपयुक्त ठरतील. विद्यार्थ्यांच्या अंगी श्रमदानाचे मुल्य रुजले तर  शाळेच्या प्रगतीस हातभार लागेल. विद्यार्थ्यांनी कोणतेही काम अंत:करणातून व  आत्मविश्वासाने केल्यास प्रत्येक कामात  यश हमखास मिळेल, असे प्रतिपादन  जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी केले.
       उस्मानाबाद तालुक्यातील खानापूर येथील केशव  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिरच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमीत्त वनराई बंधारा बांधणी व स्वच्छता शपथ व मतदान जागृती स्वीप-2 उपक्रमांतर्गत सर्वांना शपथ देण्यात आली.
            जि.प. च्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी  शि.द. बनसोडे, शिक्षणाधिकारी औदुंबर उकीरडे व  शिवाजी जाधव, उप शिक्षणाधिकारी  रमेश जोशी,  गटविकास अधिकारी  श्री. चकोर, सविता भोसले, रविंद्र लोमटे, केंद्र प्रमुख हनुमंत लाटे, सरपंच कालीदास राठोड, ग्रामसेवक माळी, प्रशालेतील शिक्षक,    शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी  आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          प्रारंभी मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण यांनी मान्यवरांना शाल,पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. सूत्रसंचलन हनुमंत मोरे यांनी केले. आभार डी. के. राठोड यांनी केले.   

 
Top