उस्मानाबाद  - केंद्र व राज्य सरकारच्या पाणी व स्वच्छता मंत्रालयाच्या राष्ट्रीय स्वच्छता अभियान मिशन स्वच्छ भारत कार्यक्‌रमांतर्गत राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचा शुभारंभ 2 ऑक्टोबर रोजी  होणार आहे. जिल्ह्यातील 622 ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत 1 हजार 689 शाळा व 1 हजार 904 अंगणवाडीमध्ये स्वच्छतेची शपथ व 10 कलमी  होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी दिली.
      संपूर्ण जिल्हा निर्मलमय करण्यासाठी स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी स्वच्छतेचा संदेश ग्रामीण भागातील प्रत्‍येक कुटुंबापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून  शौचालय नसलेल्या कुटुंबाना शौचालय बांधकाम व वापर करण्याविषयी माहिती देण्यात येणर आहे. शिवाय जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर सर्व शासकीय कार्यालय, शाळा, अंगणवाडी, शौचालय नसलेल्या कुटुंबाना गृहभेटी, गाव परिसर स्वच्छता व स्वच्छताफेरी, शालेय विद्यार्थ्यांची निबंधलेखन स्पर्धा, संस्थास्तरावरील स्वच्छता सुविधा,‍ शालेय विद्याथ्यांची चित्रकला स्पर्धा, हातधुवा दिन साजरा करण्यात येणार आहे.
           तसेच शाळेत स्वच्छते विषयी चालता बोलता कार्यक्रम, स्वच्छता दिन, कोरडा दिवस, पाणीस्त्रोत परिसर, स्वच्छता अभियान कालावधीत शौचालय बांधलेल्या कुटुंबाचा सत्कार आदि उपक्रम राबविण्यात येणार आहे. ग्रामस्थांचा सहभाग वाढावा म्हणून आंतरव्यक्ती संवाद उपक्रम राबविण्यात येणार असून जिल्ह्यात शौचालय नसलेल्या 10 लाख कुटुंबापर्यंत कुटुंब संपर्क अभियानाच्या माध्यमातून पोहचण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
          जिल्हा कक्षातील सल्लागार, विस्तार अधिकारी पंचायत, आरोग्य शिक्षण, अंगणवाडी पर्यवेक्षिका, बी. आर. सी. सी. , ग्रामसेवक,आरोग्य सहाय्यक आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती, निर्मलदुत,जलसुरक्षक, ग्रामरोजगार सेवक, शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण, पाणीपुरवठा विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी प्रत्येकी  प्रतीदिन 15 ते 20 प्रमाणे गृहभेटी देतील. गृहभेटी दरम्यान वैयक्तिक आरोग्य व घरी शौचालय बांधकाम व वापराचे महत्व ,लहान मुलांच्या विष्टेची योग्य विल्हेवाट, पिण्याच्या पाण्याची सुरक्षित साठवणे व योग्य हाताळणी  व नियमित हात धुण्याचे फायदे आदि विषयावर अधिक भर देण्यात येणार असून कुटुबाशी स्वच्छता संवाद पत्रभरुन  घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी  पाणीपुरवठा विभागाचे राजेंद्र तुबाकले यांनी दिली.
            तसेच जिल्ह्यातील निर्मल न झालेल्या 537 ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक ग्रामसेवक गावात नव्याने 20 शौचालय बांधकाम सुरु करणार असून गावपातळीवर अंणवाडी, शाळा, ग्रामपंचायत आदि सर्वशासकीय कार्यालय, तालुकास्तरावरील सर्व शासकीय कार्यालये व जिल्हास्तरीय सर्व शासकीय कार्यालयातील स्वच्छतागृहाचे साफ-सफाईचे काम करण्यात येतील.
           शिवाय अभियात कालावधीत जे गाव उत्कृष्ट काम करील त्या गावाचा गौरव करण्यात येणार आहे. प्रथम शौचालयाचे बांधकाम सुरु करणाऱ्या कुटुंबाचा सत्कार किंवा सन्मान गावस्तरावरच करण्यात येईल. सर्वाधिक गृहभेटी देणाऱ्या स्वच्छता संवादपत्र भरलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सत्कार किंवा सन्मान  जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे.           
 
Top