उस्मानाबाद : तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मधुकरराव चव्हाण हे दोन दिवस उस्मानाबाद तालुक्यातील ७२ गावात झंझावाती प्रचार दौरा करणार आहेत.
    विधानसभा निवडणुक प्रचारार्थ चव्हाण यांनी यापुर्वीच ७२ गावाचा दौरा पुर्ण केला आहे. त्यानंतर पुन्हा दि. ४ व ५ रोजी दौ-यावर येत आहेत. दि. ४ रोजी स. ८ वाजता कोंड येथे जाहिर सभा होणार आहे. तसेच स. १०.३० वा. नितळी, ११.३० वा. घुगी, १२.३० वा. लासोना, १.३० वा. समुद्रवाणी, ३ वा. बोरगाव, ४ वा. बोरखेडा, ५ वा. कनगरा आणि ६ वाजता टाकळी (बें) येथे बैठकीत ते मार्गदर्शन करणार आहेत. तर सायंकाळी ७ वाजता पाडोळी येथे जाहिर सभा होणार आहे.
    रविवार दि. ५ रोजी दिवसभरात ना. चव्हाण विविध गावांच्या दौ-यावर येत असुन करजखेडा व बेंबळी येथे जाहिर सभेत ते संबोधित करणार आहेत. रविवारी सकाळी १० वाजता करजखेडा येथे जाहिर सभा होणार आहे. तर दु. १२ वा. पाटोदा, १ वा. वडाळा, २ वा. उमरेगव्हाण, ३ वा. केशेगाव, ४ वा. अनसुर्डा, ५ वा. गौडगाव, ६ वा. आंबेवाडी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता बेंबळी येथील सभेत ना. चव्हाण संबोधित करणार आहेत. या सभा, बैठकीस काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top