उस्मानाबाद -  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनानुसार तुळजापूर येथे विधानसभा मतदार संघात सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी बी.एस. घुगे यांनी तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मतदानाची मतदानाची टक्केवारीत वाढ व्हावी  व मतदारात मतदानाबाबत जनजागृती करण्‍यासाठी सर्व यंत्रणेनी दक्ष राहण्याचे निर्देश घुगे यांनी दिल्या.
            या बैठकीस सहनिवडणूक अधिकारी के. एच. पाटील, अति. सहा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, नायब तहसीलदार एन. एस.भोसीकर (निवडणूक),एन.बी. जाधव (पुरवठा} मिडीया कक्ष प्रमुख प्रा. व्ही.आर कागदे, निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी, रास्तभाव दुकानदार आदि उपस्थित होते.
           येत्या 13 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता प्रचाराचा वेळ संपणार आहे. उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधींना प्रचारासाठी प्रभातफेरी काढता येणार नाही तसेच सभा घेता येणार नाही. प्रचाराची वेळ संपल्यानंतर अशा घटना घडल्यास तात्काळ तहसीलदार अथवा नायब तहसीलदार यांना दुरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर तात्काळ माहिती दयावी.
         तसेच दि. 14 ची रात्र महत्वाची असून उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधींकडून मतदारांना मतदान करण्यासाठी अमिष दाखवून वस्तुचे व पैशाचे वाटप होण्याची शक्यता असल्याने असे प्रकार होत असल्याचे  निदर्शनास आल्यास तात्काळ निवडणूक शाखेच्या अधिकाऱ्यांना    माहिती दयावी.
          स्वस्त धान्य रास्तभाव दुकानदार हे गावातील प्रतिष्ठीत व्यक्‍ती असल्याने गावपातळीवर मतदारांची टक्केवारी वाढविण्याचा कसोशीने प्रयत्न करावा.मात्र त्यांना कोणत्याही पक्षासाठी मतदान करा, असे त्यांना सांगता येणार नाही. किंवा तसे आरोप होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मतदार संघात जी मोठी गावे आहेत त्या गावात निवडणूक कामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना साहित्य उपलब्ध करुन देवून सहकार्य करावे, गावात कोणत्याही प्रकारचेक वाद होणार नाही, याची दक्षता घ्यावी.असेही बैठकीत निर्देश देण्यात आले.  
 
Top