तुळजापूर : शारदीय नवरात्रोत्सवात गुरूवारी दुर्गाष्टमीनिमित्त श्री तुळजाभवानी मातेची महिषासूर र्मदिनी अलंकार विशेष महापूजा मांडण्यात आली होती.यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दीकेली होती.दरम्यान, सकाळी सहा वाजता नित्योपचार अभिषेक पुजेस प्रारंभ झाला. त्याच वेळी सात वाजता होमकुंडावर नवचंडीच्या यज्ञासही सुरूवात झाली.
       या यज्ञासाठी व नवग्रहाचे पूजन करण्यासाठी यजमान म्हणून धार्मिक विधीसाठी मंदिर संस्थानचे अध्यक्षतथा जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे हे सपत्नीक उपस्थित होते.पाच तासाच्या पुजेनंतर दुपारी सव्वाबारा वाजता होमावरील पुर्णाहुती सोहळा पार पडला.या होमहवनाचे पौरोहित्य सरकारी उपाध्ये बंडोपंत पाठक, नागेश अंबुलगे, श्रीराम अपसिंगेकर, राजू प्रयाग, अनंत कांबळे यांच्यासह विनीत कोंडो, मकरंद प्रयाग आदींनी केले.यानंतर श्री तुळजाभवानी मातेची महिषासूर र्मदिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली.यात तुळजाभवानीने सहदेवतांची शक्ती घेऊन आक्रमक रूप धारण करून महिषासुराचा त्रिशुळाने वध केल्याची ही पूजा होती.या पुजेचे दर्शन घेून भाविक 'आई राजा उदो उदो, सदानंदिचा उदो उदोऽऽऽ' असा जयघोष करीत मंदिरातून बाहेर पडत होते.
यावेळी महंत तुकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा, भोपे पुजारी, पाळीकर पुजारी, उपाध्ये, सेवेकरी, आराधी, व्यवस्थापक तहसीलदार सुजीत नरहरे, सहाय्यक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, मंदिर सुरक्षा प्रमुख, पोलिस अधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
दुर्गाष्टमीनिमित्त शहरवासिय व पुजार्‍यांनी आपापल्या घरी आठ कुमारीकेचे पान-सुपारी, फळ, दक्षिणा व दूध देऊन पूजन केले.शुक्रवारी होमकुंडावर खंडेनवमीनिमित्त दुपारी बारा वाजता धार्मिक विधी होऊन घटोत्थापन होणार आहे.
 
Top