बार्शी (मल्‍लीकार्जून धारूरकर) लोकनेते गोपीनाथ मुंढे यांच्या एकमेव पाठबळावर असलेल्या वंजारी समाजाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नीतीसाठी राज्यभर वंजारी सेवा संघ कार्यरत आहे. बार्शी विधानसभेच्या निवडणूकीत कोणत्याही पक्षाच्या उमेदवारास या संघटनेने पाठींबा दिला नसल्याचे प्रदेशाध्यक्ष राहूल जाधवर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
     या निवेदनात भाजपाचे उमेदवार राजेंद्र मिरगणे यांचे नाव न घेता त्यांना उद्देशून म्हटले आहे की काही मंडळी वंजारी सेवा संघाच्या नावाचा गैरवापर करुन राजकिय स्वार्थ साधण्यासाठी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा मंडळीपासून समाजबांधवाने सावध रहावे. लोकनेते कै.गोपीनाथराव मुंढे साहेब यांच्या सामाजिक कार्याचा वसा-वारसा सक्षमपणे यापुढेही चालविण्यासाठी वंजारी सेवा संघास सहकार्य करावे. सामाजिक प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटना कटीबध्द असून कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. वंजारी सेवा संघाच्या ध्येयधोरणाविरुध्द राजकिय स्वार्थापोटी काम करणार्‍या सदस्यांनाही निलंबित करण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर प्रदेशाध्यक्ष राहूल जाधवर, जिल्हाध्यक्ष राजेश बांगर, तालुका सरचिटणीस अभिजीत माळवे यांच्या स्वाक्षरी आहेत.
 
Top